मुंब्र्यात मोठा रेल्वे अपघात टळला, पारसिक बोगद्याजवळ झाड कोसळलेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 23:33 IST2022-06-27T23:32:41+5:302022-06-27T23:33:02+5:30
ठाणे परिसरात पाऊस सुरु झाला आहे. यामुळे पारसिक बोगद्याजवळ झाड रेल्वे ट्रॅकवर कोसळले होते.

मुंब्र्यात मोठा रेल्वे अपघात टळला, पारसिक बोगद्याजवळ झाड कोसळलेले
मुंब्र्यात काही वेळापूर्वी मोठा रेल्वे अपघात टळला आहे. एक्स्प्रेसच्या चालकाने आपत्कालीन ब्रेक लावल्याने दुर्घटना टळली आहे.
ठाणे परिसरात पाऊस सुरु झाला आहे. यामुळे पारसिक बोगद्याजवळ झाड रेल्वे ट्रॅकवर कोसळले होते. रात्रीचा अंधार असल्याने रेल्वेच्या चालकाला तितकासा अंदाज आला नाही. मात्र, जवळ येताच हे पडलेले झाड दिसले आणि त्याने इमरजन्सी ब्रेक लावला.
सुदैवाने ट्रेन घसरली नाही. तसेच झाड पडलेल्या ठिकाणाच्या आधीच ट्रेन थांबल्याने मोठा अपघात टळला आहे. हे झाड तातडीने कापून बाजुला करण्यात आले आहे.