भिवंडीत कापूर अगरबत्ती बनविणाऱ्या कारखान्यास भीषण आग
By नितीन पंडित | Updated: November 26, 2022 17:47 IST2022-11-26T17:46:22+5:302022-11-26T17:47:58+5:30
गोदामातील कच्चामाल जळून खाक

भिवंडीत कापूर अगरबत्ती बनविणाऱ्या कारखान्यास भीषण आग
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: येथील तालुक्यातील सोनाळे येथील कापूर व अगरबत्ती बनविणाऱ्या कारखान्यास शनिवारी सकाळी भीषण आग लागली होती. या भीषण आगीत कंपनीसह गोदामातील कच्चामाल जळून खाक झाला आहे.सोनाळे गावाच्या गोदाम पट्यातील लक्ष्मी कंपाऊंड येथे ही दुर्घटना घडली आहे.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण-डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या एकूण पाच गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले. या भीषण आगीत तळ अधिक एक मजली कापूर ,अगरबत्ती बनविणारी कंपनी असलेले गोदामसह कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने परिसरात धुराचे लोट पसरले होते. या भीषण आगीवर तब्बल पाच तासांनी नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.