मुंब्र्यात गोदामाला लागली भीषण आग

By कुमार बडदे | Updated: October 16, 2022 21:22 IST2022-10-16T21:22:01+5:302022-10-16T21:22:35+5:30

येथील शिळफाटा परीसरातील खान कपाऊंड मध्ये असलेल्या पत्र्याच्या गोदामाला  रविवारी संध्याकाळी भिषण आग लागली.

A huge fire broke out in a godown in Mumbra | मुंब्र्यात गोदामाला लागली भीषण आग

मुंब्र्यात गोदामाला लागली भीषण आग

मुंब्राः

येथील शिळफाटा परीसरातील खान कपाऊंड मध्ये असलेल्या पत्र्याच्या गोदामाला  रविवारी संध्याकाळी भिषण आग लागली. सूत्रानी दिलेल्या माहिती नुसार या गोदामामध्ये प्लँस्टिकच्या टाकाऊ वंस्तू जमा करुन ठेवण्यात आल्या होत्या.त्या जळून खाक झाल्या.ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळले नसून,प्लँस्टिक मुळे वेगात पसरलेली आग अद्याप पर्यत आग विझली नसून,शिळ  अग्निशमन केंद्रातील जवान १ फायर वाहन आणि १वॉटर टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा शर्थीने प्रयत्न करता आहेत.अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या  माहिती नुसार या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन विभागातील अधिका-यांनी दिली.

 

Web Title: A huge fire broke out in a godown in Mumbra