ठाण्यात हाँटेलची शेड पडली; तिघे जखमी
By सुरेश लोखंडे | Updated: June 25, 2023 22:36 IST2023-06-25T22:36:09+5:302023-06-25T22:36:21+5:30
उपचार करुन घरी पाठवण्यात आले.

ठाण्यात हाँटेलची शेड पडली; तिघे जखमी
ठाणे : पावसा दरम्यान घोडबंदर रोडवरील हिरानंदानी येथील एका ५ स्टार हॉटेलमध्ये २ महिला व १ पुरुष बसले असताना, अचानक शेड पडली. त्यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत असून त्यांना हिरानंदानी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार करुन घरी पाठवण्यात आले.
ही घटना उशिरा रात्री घडली असून घटनास्थळी ठामपा उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी भेट दिली. आज दिवसभरात एकूण ४० तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
या ठिकाणी साचले पाणी
शहरातील खोपट, एसटी बस डेपो जवळ वागळे इस्टेट येथील राधेश्याम तबेला तसेच सी. पी.तलाव, मुंब्र्यात आयडियल मार्केट आणि गोकुळनगर येथील लाल मैदान आदी अशा आठ ठिकाणी पाणी साचले होते.