शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

१७ महिलांचे लैंगिक शोषण करणारी टोळी गजाआड, ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 10:40 IST

आरोपींनी महाराष्ट्रातील विविध भागात १७ मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. यातील अटक आरोपीपैंकी बहुतेक आरोपी हे राबोडी भागातच वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. 

ठाणे : गरजू मुली अथवा महिलांना हेरून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या ७ जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखा घटक एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या. आरोपींनी महाराष्ट्रातील विविध भागात १७ मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. यातील अटक आरोपीपैंकी बहुतेक आरोपी हे राबोडी भागातच वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. 

या गुन्ह्यातील पीडित मुलीला पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टोळीने दिशाभूल करून स्वत:च्या ताब्यात ठेवल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, तिने पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टोळीची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा घटक १ च्या पथकाने व राबोडी पोलिसांनी समांतररित्या तपास सुरू केला.  तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने  अस्लम शमी उल्ला खान (५४), सलीम जखरुद्दीन शेख (४५), मांत्रिक बाबा साहेबलाल वजीर शेख ऊर्फ युसुफ बाबा (६१), तौफिक शेख (३०), शबाना शेख (४५), शबिर शेख (५३), हितेंद्र शेट्टे (५६, )  यांना अटक केली. 

अशी करायचे फसवणूकअटक करण्यात आलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, गरजू मुली अथवा महिलांना हेरून त्यांचा पैशाचा पाऊस पडतो, यावर विश्वास बसावा यासाठी त्यांना व्हिडीओ दाखवला जात होता. व्हिडिओमध्ये एक महिला नग्न अवस्थेत झोपलेली असून, तिच्या बाजूला पैशांचा ढिगारा पडलेला दिसत आहे. कोट्यवधी रुपयांचे प्रलोभन दाखवून त्यांना धार्मिक विधी करण्यासाठी तयार केले जात होते. मांत्रिक पैशांचा पाऊस पाडण्याची पूजा करीत असताना हजर असलेल्या व्यक्तीच्या अंगात जीन येईल व त्याची पूजेला बसलेली नग्न महिला, मुलीसोबत संभोग करण्याची इच्छा होईल. त्याला शरीरसुख दिल्यावरच पैशांचा पाऊस पडेल, असे आरोपींनी पीडित मुलींनी सांगितले. या भूलथापांवर राज्यभरातील १७ मुली, महिला बळी पडल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले आहे. 

यांनी केली कारवाईही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले, पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, सहायक पोलिस आयुक्त नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील, पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी व आदींच्या पथकाने कारवाई केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMolestationविनयभंग