मुंब्र्यात दुकानाला लागली आग; तीन तासादरम्यान दोन ठिकाणी लागल्या आगी

By कुमार बडदे | Updated: March 10, 2023 11:20 IST2023-03-10T11:20:24+5:302023-03-10T11:20:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंब्राः शुक्रवारी सकाळी येथील शिळफाटा परीसरातील एका विद्युत  ट्रान्सफॉर्मरचा झालेला स्फोट आणि  भूमिगत विद्युत केबलला लागलेली ...

A fire broke out at a shop in Mumbra; Fires broke out in two places within three hours | मुंब्र्यात दुकानाला लागली आग; तीन तासादरम्यान दोन ठिकाणी लागल्या आगी

मुंब्र्यात दुकानाला लागली आग; तीन तासादरम्यान दोन ठिकाणी लागल्या आगी

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंब्राः शुक्रवारी सकाळी येथील शिळफाटा परीसरातील एका विद्युत  ट्रान्सफॉर्मरचा झालेला स्फोट आणि  भूमिगत विद्युत केबलला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास  मुंब्रा शहरातील  कौसा भागातील श्रीलंका परीसरात असलेल्या रेहान बाग या पाच मजली  इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या इम्रान सय्यद याच्या दुकानाला आग लागली.

याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन  दलाच्या जवानांनी दोन फायर वाहन,एक वाँटर टँकर आणि एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीने पाऊन तासात आगीवर नियंत्रण मिळवून ती पूर्णपणे विझवली.सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठामपाच्या आपत्ती व्यावस्थापन कक्षातील अधिका-यांनी दिली.

Web Title: A fire broke out at a shop in Mumbra; Fires broke out in two places within three hours

टॅग्स :fireआग