वाळलेलं नारळाचं झाड घरावर पडलं, छताचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 15:08 IST2022-02-04T15:07:55+5:302022-02-04T15:08:11+5:30

घरावर झाड पडल्याच्या घटनेची माहिती मिळताच आपत्ती विभाग आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.

A dried coconut tree fell on the house, damaging the roof | वाळलेलं नारळाचं झाड घरावर पडलं, छताचे नुकसान

वाळलेलं नारळाचं झाड घरावर पडलं, छताचे नुकसान

ठाणे : नौपाडयातील रामकृष्ण जोशी यांच्या मालकीचे तळ अधिक एक मजली असलेल्या 'उमा निवास' घरावर वाळलेले नारळाचे झाड पडल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

घरावर झाड पडल्याच्या घटनेची माहिती मिळताच आपत्ती विभाग आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत उमा निवासच्या छताचे मोठे नुकसान झाले असून कोणालाही दुखापत किंवा कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच तातडीने झाड हटविण्यात आल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.
 

Web Title: A dried coconut tree fell on the house, damaging the roof