शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या तावडीतून निसटलेला प्रिन्स जेरबंद; हलगर्जीपणामुळे हवालदारावर कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: November 11, 2024 06:07 IST

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ६ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.४५ वाजता तो फरार झाला होता. 

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शस्त्रांची तस्करी करणारा आरोपी प्रिन्स कैलास विश्वकर्मा (वय १९, रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) हा तीन दिवसांपूर्वी पोलिसांच्या तावडीतून निसटला होता. त्याला पुन्हा लखनऊमधून अटक करण्यात यश आल्याची माहिती चितळसर पोलिसांनी रविवारी दिली. याप्रकरणात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत एका पोलिस हवालदारालाही निलंबित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रिन्स हा ठाण्याच्या घोडबंदर भागात रिव्हॉल्व्हर विक्रीसाठी आला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वरुडे यांच्या पथकाला मिळताच त्याला सापळा लावून ५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १.३० वाजता अटक केली होती. त्याच्याविरुद्ध आर्म्स ॲक्ट  प्रमाणे  गुन्हा दाखल झाला होता. त्याला ठाणे न्यायालयाने ७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याची चितळसर पोलिस ठाण्यात डिटेक्शन रूममध्ये चौकशी सुरू असतानाच तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ६ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.४५ वाजता त्याला लावलेल्या बेडीतून हात काढून फरार झाला होता. 

आराेपीला लवकरच ठाण्यात आणणार

-  प्रिन्सला शोधण्यासाठी दोन पथकांची निर्मिती केली होती. गुन्हे अन्वेषण विभागाकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. तो उत्तर प्रदेशातील लखनऊमधील इंदिरानगर भागात त्याच्या घरी असल्याची माहिती चितळसर पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपायुक्त जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पंकज लहाने, हवालदार नितीन बांगर आणि पोलिस नाईक पांडूरंग झोडगे यांच्या पथकाने लखनऊ  भागात सीडीआर तसेच खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे उत्तरप्रदेशातील विशेष कृती दलाच्या (एसटीएफ) मदतीने त्याला ९ नोव्हेंबर रोजी रात्री ९.१० वाजता ताब्यात घेतले. 

- त्याला लखनऊ पोलिस आयुक्तालयातील इंदिरानगर पोलिस ठाण्यात हजर करुन स्थानिक न्यायालयात हजर केले. 

- न्यायालयाने त्याला ट्रान्झिट रिमांड दिली असून लवकरच त्याला ठाण्यात आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हवालदार ज्योतिराम मोरकाने निलंबित आरोपी प्रिन्स पळून गेल्याने चितळसर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २६२  प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलिस हवालदार ज्योतिराम मोरकाने यांच्यावर वागळे इस्टेट, परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी निलंबनाचे आदेश दिले होते.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी