उल्हासनगरात लॉजची तोडफोड, गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: March 24, 2023 18:36 IST2023-03-24T18:36:01+5:302023-03-24T18:36:23+5:30
उल्हासनगरात लॉजची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगरात लॉजची तोडफोड, गुन्हा दाखल
उल्हासनगर: कॅम्प नं-३, चोपडा कोर्ट परिसरातील के के रे सिडेन्सी लॉज मध्ये अनैतिक धंदे सुरू असल्याचा आरोप काही महिला व नागरिकांनी करून लॉज बंद करण्याची मागणी बुधवारी सायंकाळी ७ वाजता करीत सामानाची तोडफोड केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तब्बल १५ जणांवर गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-३, चोपडा कोर्ट परिसरात के के रेसिडेन्सी लॉज असून लॉज मध्ये अनैतिक धंदे सुरू असल्याने, लॉज बंद करण्याची मागणी महिला व पुरुषांनी बुधवारी सायंकाळी ७ वाजता केली. यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी व नागरिकांनी लॉज बंद करण्याची घोषणाबाजी करीन काही सामानाची तोडफोड करून नुकसान केले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दीपक जाधव, अनिता जाधव, रेखा बागुल, सरला सुरवाडे, ताई रामा सुरवाडे यांच्यासह १० जणांवर गुन्हे दाखल झाले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.