ठामपाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By जितेंद्र कालेकर | Updated: February 16, 2023 09:09 IST2023-02-16T09:06:32+5:302023-02-16T09:09:07+5:30

पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे...

A case has been registered against Jitendra Awada and seven persons in connection with the attack on Thane municipal corporation Assistant Commissioner Mahesh Aher | ठामपाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ठामपाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे : ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे आदी गंभीर कलमांखाली बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे. 

    आहेर यांच्यावर अभिजित पवार,विक्रम खामकर आणि हेमंत वाणी आदींनी ठाणे महापालिकेच्या आवारात बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास ते ठाणे महापालिका गेट क्रमांक चार येथे मोबाईलवर बोलत असतांना ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. आपल्या तक्रारीमध्ये आहेर यांनी म्हटले आहे की, त्यांनी विक्रम खामकर यांच्याविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्हयाचा आणि आणि आव्हाड यांच्या मतदारसंघात बेकायदा बांधकाम तोडल्याचा तसेच त्यांचे न ऐकल्याचा राग मनात धरुन अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि इतर तिघांनी त्यांच्याजवळ येत आव्हाड यांनी तुला संपवायला सांगितल्याचे सांगत बंदूक आणि चॉपरने वार करण्याच्या उद्देशाने आहेर यांना मारहाण केली. त्यांचे अंगरक्षक आल्यानंतर मात्र तिथून पळ काढला. जातांना तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली. या घटनेनंतर जिल्हा शासकीय रुग्णालतया उपचारासाठी दाखल केलेल्या आहेर यांनी नौापाडा पोलिसांकडे ही तक्रार दिली. दरम्यान, घटनास्थळी सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त गणेश गावडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ आदींदी भेट देऊन पाहणी केली.
 

Web Title: A case has been registered against Jitendra Awada and seven persons in connection with the attack on Thane municipal corporation Assistant Commissioner Mahesh Aher