भिवंडीत विहिरीत पोहण्यास गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

By नितीन पंडित | Updated: June 30, 2024 22:17 IST2024-06-30T22:16:00+5:302024-06-30T22:17:16+5:30

प्रेम बन्सी पोळ असे मयत मुलाचे नाव आहे. 

A 14-year-old boy drowned while going for a swim in a well in Bhiwandi | भिवंडीत विहिरीत पोहण्यास गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

भिवंडीत विहिरीत पोहण्यास गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

भिवंडी: शहरातील पद्मानगर परिसरातील आशिष सिनेमा कंपाऊंड मध्ये असलेल्या विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली आहे. प्रेम बन्सी पोळ असे मयत मुलाचे नाव आहे. 

सकाळी मित्रांसोबत प्रेम या विहिरीत पोहण्यासाठी गेला होता.त्यावेळी तो पाण्यातून वर आलाच नाही.त्यानंतर त्याच्या सोबत असलेली मुले घरी जाऊन त्यांनी याची माहिती दिल्यानंतर पालिकेच्या आपत्कालीन कक्षाला माहिती मिळाल्यावर अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्यात शोध घेऊन त्याचा मृतदेह सायंकाळी बाहेर काढला.

त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून भिवंडी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 

Web Title: A 14-year-old boy drowned while going for a swim in a well in Bhiwandi