शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये कोरोना काळातही ९३ टक्के पोलिओ लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 00:10 IST

गृहभेटीत उर्वरित लक्ष्य : प्रशासनाकडून नियोजनबद्ध कार्यक्र म

लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर आणि वसई या तीन तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यापैकी डहाणू तालुक्यात ४० हजार ३९ अपेक्षित लाभार्थ्यांपैकी ३७ हजार ३११ लाभार्थ्यांना डोस पाजण्यात आला. उर्वरित २ हजार ७२८ लाभार्थ्यांना गृहभेटीतून लसीकरण केले जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी संदीप गाडेकर यांनी दिली.

बालकांना प्राथमिक लसीकरण, नियमित सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत ० ते ५ वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे ही पोलिओ निर्मूलनाच्या यशासाठी असलेली त्रिसूत्री राबविली जात आहे. त्यानुसार रविवारी, २० सप्टेंबर रोजीच्या लसीकरण मोहिमेला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी केले होते.

पोलिओबाबत अधिकाधिक जनजागृती व्हावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, नगराध्यक्ष, नगरसेवक, पोलीस पाटील, जि.प. सदस्य ग्रापंचायत सदस्य यांनी मोहिमेचे उद्घाटन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते.कोरोना काळात लहान बालकांना लसीकरण करते वेळी नागरिकांकडून कसा प्रतिसाद मिळेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. रविवारी प्रत्येक बूथवर सॅनिटायझर, हात धुण्याची व्यवस्था लसीकरण करणाºया कर्मचारी स्वयंसेवक यांनी मास्क आणि ग्लोव्हज घातले होते.

प्रत्येक लाभार्थ्याला लसीकरण केल्यानंतर हात सॅनिटाईज करणे, येणाºया लाभार्थ्यांमध्ये योग्य ते अंतर ठेवण्यात येणे, सामाजिक अंतर पाळले तर बालकांना स्पर्श न करता केवळ पालकांच्या स्पर्शानेच बालकांना लस पाजणे आदी नियमांचे आरोग्य आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कसोशीने पालन केले.दरम्यान, २ हजार ७२८ बालके लसीकरणापासून वंचित राहिली आहेत. त्यांना गृहभेटीद्वारे कर्मचारी डोस पाजणार आहेत.या वेळेस सॅनिटायझर मास्क व ग्लोज घालून तसेच अन्य नियम पाळण्यात येऊन लसीकरण केले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.