मीरा भाईंदर मध्ये म्युकरमायकोसिसचे ९ रुग्ण ; २ रुग्णांना दिला डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 06:00 PM2021-05-15T18:00:18+5:302021-05-15T18:01:14+5:30

मीरारोड - मीरा भाईंदर म्युकरमायकोसिसचे एकूण ९ रुग्ण असून त्यातील २ रुग्णांना घरी पाठवण्यात आले असून ७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत . सर्वाना कोरोना होऊन गेला होता.

9 patients with mucomycosis in Mira Bhayander Discharge given to 2 patients | मीरा भाईंदर मध्ये म्युकरमायकोसिसचे ९ रुग्ण ; २ रुग्णांना दिला डिस्चार्ज

मीरा भाईंदर मध्ये म्युकरमायकोसिसचे ९ रुग्ण ; २ रुग्णांना दिला डिस्चार्ज

Next

मीरारोड - मीरा भाईंदर म्युकरमायकोसिसचे एकूण ९ रुग्ण असून त्यातील २ रुग्णांना घरी पाठवण्यात आले असून ७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत . सर्वाना कोरोना होऊन गेला होता. ह्या ९ पैकी मीरा भाईंदर मधील ५ तर अन्य शहरातील ४ रुग्ण आहेत . 

कोरोनाची लागण झाल्यावर उपचारासाठी जास्त प्रमाणात स्टेरॉइडचा वापर  केला गेल्यास रोग प्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्यां मध्ये म्युकरमायकोसिसचे दुष्परिणाम दिसू लागतात . मीरा भाईंदर मध्ये सध्या २ रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णावर उपचार सुरु आहेत . भाईंदरचे रामलोक तर मीरारोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे  रुग्ण दाखल आहेत . 

महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ . नंदकिशोर लहाने यांनी सांगितले कि , आता पर्यंत म्युकरमायकोसिसचे ९ रुग्ण आढळून आले आहेत . त्यात मीरा भाईंदर मधील  तर अन्य शहरातील ४ रुग्ण आहेत . परंतु ह्या पैकी २ जणांना उपचारा नंतर घरी पाठवण्यात आले आहे . बहुतांश  म्युकरमायकोसिसचे रुग्ण हे ५० वर्षांच्या वरील आहेत .  

कोरोना रुग्णांना उपचार दरम्यान रुग्णाची प्रकृती आणि अन्य आजार यांचा विचार करून स्टेरॉइडचा वापर केला पाहिजे . म्युकरमायकोसिस मुळे घाबरून जाण्याचे कारण नसले तरी नागरिकांनी एलर्जी वा त्रास जाणवत असल्यास तो घरी अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांना दाखवले पाहिजे असे डॉ . लहाने म्हणाले . 

Web Title: 9 patients with mucomycosis in Mira Bhayander Discharge given to 2 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.