शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरमधील नियोजित मेट्रोची शहरांतर्गत 9 स्थानके बांधण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 19:46 IST

मीरा-भार्इंदर शहरात दहिसर ते कासारवडवली दरम्यान नियोजित असलेला मेट्रो प्रकल्प मीरा-भार्इंदर शहर मार्गे विस्तारीत करण्यात आला आहे.

राजू काळेभार्इंदर - मीरा-भार्इंदर शहरात दहिसर ते कासारवडवली दरम्यान नियोजित असलेला मेट्रो प्रकल्प मीरा-भार्इंदर शहर मार्गे विस्तारीत करण्यात आला आहे. त्याच्या तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात एमएमआरडीए आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्या शिष्टमंडळाने शहराला भेट दिली होती. त्यावेळी मेट्रो कारशेडसह नियोजित स्थानकांची ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार येत्या ८ डिसेंबरच्या महासभेत नियोजित मेट्रोच्या शहरांतर्गत एकुण ९ स्थानकांचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.यात शहरांतर्गत असलेला राष्ट्रीय महामार्ग (मुंबई-अहमदाबाद महामार्ग) क्रमांक ८ वर २ मेट्रो स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यात दहिसर दिशेकडील पांडुरंगवाडी व अमर पॅलेस हॉटेल ठिकाणांचा समावेश आहे. भार्इंदर पुर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य मार्गावर ५ स्थानके निश्चित करण्यात आली असुन त्यात काशिमिरा वाहतूक बेटालगतच्या झंकार कंपनी, मीरारोड परिसरातील साईबाबा नगर, दिपक हॉस्पिटल, तसेच या मार्गाचा छेदमार्ग असलेल्या गोल्डन नेस्ट रस्त्यावरील क्रिडा संकुल व इंद्रलोक ठिकाणांचा समावेश आहे.भार्इंदर पश्चिमेकडे २ स्थानके प्रस्तावित करण्यात आली असुन त्यात मॅक्सस मॉल व नेताजी सुभाषचंद्र मैदान ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. नियोजित मेट्रो मार्ग काशिमिरा वाहतुक बेटाहुन छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग पुढे थेट भार्इंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान व पुर्वेकडील इंद्रलोकपर्यंत विस्तारीत करण्यात आला आहे. या नियोजित मेट्रो मार्गाच्या पाहणीकरीता एमएमआरडीए आयुक्त यु. पी. एस. मदान व अतिरीक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी फेब्रुवारीमध्ये शहराला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी नियोजित मेट्रो मार्गासाठी आवश्यक असलेल्या कारशेडसह मेट्रो स्थानकांच्या जागांची पाहणी केली होती. त्यावेळी पालिकेकडुन कारशेडसाठी चार जागा प्रस्तावित करण्यात आल्या. त्यात भार्इंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान परिसर, उड्डाणपुलालगतच्या दक्षिणेकडील जागा, पुर्वेकडील इंद्रलोक व घोडबंदर गावाकडील ट्रक टर्मिनल जागेचा समावेश आहे. या जागांच्या चाचपणीसह मेट्रो मार्गातील संभाव्य अडथळे व त्यावरील उपयांचा आढावा एमएमआरडीए आयुक्तांकडुन घेण्यात आला होता. त्यानुसार एमएमआरडीए प्रशासनाने निश्चित केलेल्या मेट्रो स्थानकांच्या नावांवर पालिका सभागृहात शिक्कामोर्तब करण्याची सुचना पालिकेला केल्याने त्याचा प्रस्ताव येत्या ८ डिसेंबरच्या महासभेत सादर केला जाणार आहे. मेट्रो प्रकल्प टप्पा क्रमांक ७ मधील मार्ग दहिसर पर्यंत निश्चित करण्यात आल्यानंतर आ. प्रताप सरनाईक यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहिसरपर्यंतची मेट्रो मीरा-भार्इंदर शहरांतर्गत विस्तारीत करण्याचे निर्देश एमएमआरडीएला दिले. त्याचा सुसाध्यता अहवाल तयार करण्याचे निर्देश देत प्रकल्पाच्या ६ हजार ५०० कोटी खर्चाच्या प्रस्तावाला त्यांनी २९ मार्चच्या एमएमआरडीए बैठकीत मान्यता दिली.

टॅग्स :Metroमेट्रोMira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक