सहा महापालिकांना मुद्रांकांचे ८९.८७ कोटी
By Admin | Updated: August 15, 2015 23:32 IST2015-08-15T23:32:22+5:302015-08-15T23:32:22+5:30
राज्य शासनाकडून वसूल केल्या जाणाऱ्या मुद्रांक शुल्क अधिभारातून महापालिकांना देण्यात येणाऱ्या १ टक्का रकमेतून एप्रिल ते जून २०१५ या तीन महिन्यांच्या अनुदानापोटी ठाणे जिल्ह्यातील

सहा महापालिकांना मुद्रांकांचे ८९.८७ कोटी
- नारायण जाधव, ठाणे
राज्य शासनाकडून वसूल केल्या जाणाऱ्या मुद्रांक शुल्क अधिभारातून महापालिकांना देण्यात येणाऱ्या १ टक्का रकमेतून एप्रिल ते जून २०१५ या तीन महिन्यांच्या अनुदानापोटी ठाणे जिल्ह्यातील सहा पालिकांना ८९ कोटी ८७ लाख ७४ हजार रुपये शासनाने वितरीत केले आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची या महापालिकांकडे असलेल्या थकबाकीची चार कोटी ८७ लाख ८४ हजार ५६४ रुपयांची रक्कम वगळून हे अनुदान देण्यात आले आहे. यात उल्हासनगर महापालिकेच्या हिश्श्याची एक कोटी १९ लाख ८४ हजार ५६४ ही सर्व रक्कम जीवन प्राधिकरणाच्या थकबाकीपोटी वळती केल्याने त्या महापालिकेला एक छदामही मिळालेला नाही.
शासनाने ठाणे जिल्ह्यातील सात महापालिकांसह राज्यातील २५ महापालिकांना एकूण १६७ कोटी ९९ लाख सात हजार १९६ रुपये वितरीत केले आहेत. त्यात जिल्ह्यातील महानगरांच्या वाट्याला सहा पालिकांना ८९ कोटी ८७ लाख ७४ हजार रुपये आले आहेत.
ठाणे मनपा
थकबाकीपोटी वळती केलेली रक्कम -..........
प्रत्यक्षात दिलेले अनुदान - २६ कोटी ४३ लाख ४५ हजार
नवी मुंबई मनपा
थकबाकीपोटी वळती केलेली रक्कम - .........
प्रत्यक्षात दिलेले अनुदान - १२ कोटी ३४ लाख ४९ हजार
कडोंमपा
थकबाकीपोटी वळती केलेली रक्कम - ८९ लाख
प्रत्यक्षात दिलेले अनुदान - १० कोटी ९८ लाख ४१ हजार
भिनिश मनपा
थकबाकीपोटी वळती केलेली रक्कम - एक कोटी ३७ लाख
प्रत्यक्षात दिलेले अनुदान - एक कोटी ४९ लाख ४० हजार
वसई-विरार मनपा
थकबाकीपोटी वळती केलेली रक्कम - तीन लाख
प्रत्यक्षात दिलेले अनुदान - १५ कोटी ४९ लाख ३९ हजार
उल्हासनगर मनपा
थकबाकीपोटी वळती केलेली रक्कम - एक कोटी १९ लाख ८४ हजार ५६४
प्रत्यक्षात दिलेले अनुदान - ......