मीरारोडमध्ये जुगार खेळणाऱ्या ७ महिलांसह २ पुरुषांना पकडले
By धीरज परब | Updated: February 12, 2023 20:28 IST2023-02-12T20:28:18+5:302023-02-12T20:28:59+5:30
मीरारोडच्या शांतीनगर सेक्टर ४ मधील एका इमारतीच्या सदनिकेत चालणारा जुगारचा अड्डा गुन्हे शाखा कक्ष १ ने उघडकीस आणला आहे.

मीरारोडमध्ये जुगार खेळणाऱ्या ७ महिलांसह २ पुरुषांना पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरारोडच्या शांतीनगर सेक्टर ४ मधील एका इमारतीच्या सदनिकेत चालणारा जुगारचा अड्डा गुन्हे शाखा कक्ष १ ने उघडकीस आणला आहे. अड्डा चालवणाऱ्या महिलेसह जुगार खेळणाऱ्या ६ महिला व २ पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथकाने छापा टाकला असता सदनिका धारक महिला तिच्या बेडरूम मध्ये जुगाराचा अड्डा चालवत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी बेडरुम मध्ये तपासले असता तेथे ६ महिला व २ पुरुष हे तीन पत्त्यांचा जुगार खेळत असताना सापडले. अड्डा चालवणारी महिला प्रत्येक डावा मागे पैसे घेत असे तर जुगार खेळण्यास विविध भागातून जुगारी महिला आणि पुरुष येत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
पोलिसांनी ७ महिलाना पोलीस ठाण्यात हजर होण्याची ताकीद दिली तर २ पुरुषांना ताब्यात घेत नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जुगाऱ्यां कडून १९ हजार ४१० रुपयांची रोख पोलिसांनी जप्त केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"