उल्हासनगरातील शाळा चोरांच्या रडारवर; सिंधू विद्या निकेतन शाळेत सात लाखाची चोरी

By सदानंद नाईक | Updated: June 26, 2023 14:32 IST2023-06-26T14:30:59+5:302023-06-26T14:32:04+5:30

अधिक तपास पोलीस करीत आहेत.

7 lakh stolen from sindhu vidya niketan school in ulhasnagar | उल्हासनगरातील शाळा चोरांच्या रडारवर; सिंधू विद्या निकेतन शाळेत सात लाखाची चोरी

उल्हासनगरातील शाळा चोरांच्या रडारवर; सिंधू विद्या निकेतन शाळेत सात लाखाची चोरी

सदानंद नाईक,  उल्हासनगर : कॅम्प नं-३, शिवाजी चौकातील सिंधू विद्या निकेतन शाळा कार्यालयातील कपाटातून ७ लाख १० हजार रोख रक्कमेसह कॉम्प्युटर चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून चोरट्यांनी शाळांना टार्गेट केल्याचे बोलले जात आहे.

 उल्हासनगरातील शाळा चोरट्यांच्या रडारवर आल्या असून गेल्या आठवड्यात महापालिका शाळेतील १० पंखे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. त्या पाठोपाठ कॅम्प नं-३ शिवाजी चौक परिसरातील सिंधू विद्या निकेतन शाळेच्या गेटचे व शटरचे तोडून चोरट्यांच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयातील कापटाचे डाव्हर मधील ७ लाख १० हजार ४१० रुपये रोख रक्कम तसेच ६ हजाराचे संगणक असे एकून ७ लाख १६ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शनिवारी रात्री चोरीची घटना उघड झाली असून शाळेच्या मुख्याध्यापिका जिया लुधवानी यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: 7 lakh stolen from sindhu vidya niketan school in ulhasnagar