६९ हजारांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:38 AM2021-03-06T04:38:59+5:302021-03-06T04:38:59+5:30

उल्हासनगर : हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालगावमध्ये राहणारे सखाराम कराळे गुरुवारी सकाळी भाजीपाला आणण्यासाठी घर बंद करून गेले ...

69 thousand burglary | ६९ हजारांची घरफोडी

६९ हजारांची घरफोडी

Next

उल्हासनगर : हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालगावमध्ये राहणारे सखाराम कराळे गुरुवारी सकाळी भाजीपाला आणण्यासाठी घर बंद करून गेले होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातून ६९ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

--------------------------

रिक्षा चोरीला

उल्हासनगर : कॅम्प नं-४ आशेळेगाव येथील राहणारे लक्ष्मण घोडके यांनी गुरुवारी घरासमोरील रस्त्याच्या बाजूला उभी केलेली रिक्षा चोरीला गेली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

-----------------

अखेर डेब्रिज उचलले

उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वेस्थानकाजवळील रस्त्यावर डेब्रिज पडले होते. यामुळे अपघात होत असल्याचा आरोप मनसेचे सचिन कदम यांनी केल्यावर, महापालिकेने डेब्रिज उचलले आहे. नागरिकांनीही याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: 69 thousand burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.