...म्हणून आज ६५ जोडपी अडकली विवाहबंधनात; अनेकांनी ४५ दिवस आधीच केली नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 19:13 IST2022-02-22T19:10:54+5:302022-02-22T19:13:46+5:30
ठाण्यात आज ६५ जणांनी बांधली लगीनआठ

...म्हणून आज ६५ जोडपी अडकली विवाहबंधनात; अनेकांनी ४५ दिवस आधीच केली नोंदणी
- रणजीत इंगळे
आपल्याला हव्या असणाऱ्या लकी आणि आवडत्या नंबर साठी अनेक जण नको त्या खटापटी करत असतात. यात गाडीचा नंबर असो, मोबाईलचा नंबर असो वा घराचा नंबर. तो नंबर मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. अश्याच वेगळ्या आकड्याचे औचित्य साधून ठाण्यातील 65 जोडपी विवाहबंधनात अडकली आहेत.
आजची तारीख 22-2-22 असल्याने यामध्ये 2 हा आकडा सहा वेळा आला आहे. याच अनोख्या या दिवसाचे औचित्य साधून ठाण्यातील जवळपास 65 जोडपी विवाह बंधनात अडकली आहेत. आमच्यासाठी हा लकी दिवस असून या अनोख्या दिवशी आम्ही विवाह बंधनात अडकायचे ठरवले होते तसेच अनोखी तारीख पुन्हा कधी येणार नाही यासाठी पंचेचाळीस दिवस अगोदरच रजिस्टेशन करून ठेवल्याच काही जोडप्यांचनी सांगितलं. पुढे या तारखेचा दिवस पुन्हा कधीच येणार नाही आणि ही तारीख आयुष्यभर लक्षात राहणार आहे. आजच्या तारखेत 2 आकडा सहा वेळा आल्याने हा शुभ दिवस असल्याचे नवविवाहित जोडप्यांनी सांगितले.