शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

६ वर्षीय मुलीचा मृत्यू, अनधिकृत स्विमिंग पूल तोडण्याची अखेर ५० दिवसांनी पालिकेला उपरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 21:30 IST

आयसीसीआय बँकेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सह कुटुंब एक ग्रुप चौकच्या डोंगरावरील यूटर्न रिसॉर्ट परिसरातील २५ क्रमांकाच्या  बंगल्यात पर्यटनसाठी आला होता.

मीरारोड :- 

भाईंदरच्या उत्तन - चौक भागातील एका रिसॉर्ट परिसरातील बंगल्याच्या अनधिकृत तरण तलावात पडून ६ वर्षीय चिमुरडीचा बळी गेला असताना त्या अनधिकृत स्विमिंग पुलावर तोडक कारवाईसाठी मीरा भाईंदर महापालिकेला तब्बल ५० दिवसांनी कारवाई करण्याची उपरती झाली. शनिवारी पालिकेने सदर अनधिकृत स्विमिंग पूल तोडला. 

आयसीसीआय बँकेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सह कुटुंब एक ग्रुप चौकच्या डोंगरावरील यूटर्न रिसॉर्ट परिसरातील २५ क्रमांकाच्या  बंगल्यात पर्यटनसाठी आला होता. त्यावेळी तेथील स्विमिंग पूल मध्ये दहिसरच्या नाडकर्णी कुटुंबातील गीतिका हि ६ वर्षाची चिमुरडी स्विमिंग पूल मध्ये पडून मरण पावली होती. 

उत्तन सागरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत लांगी व पथकाने तपास केला असता सदर बंगलाच्या स्विमिंग पूल ला महापालिकेचे परवानगीच नव्हती . तसेच त्याठिकाणी लाईफगार्ड, सुरक्षा रक्षक व सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नसल्याने गीतिका हीच बळी गेल्याचे समोर आले.

११ एप्रिल रोजी गीतिकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी भाजपा नगरसेवक अरविंद शेट्टी यांचा भाऊ अशोक आनंदा शेट्टी सह सोनाली केवलरामनी, व्यवस्थापक सेवियो आणि मिट्टू  पुरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

परंतु ६ वर्षाच्या चिमुरडीच्या बळीला कारणीभूत ठरणार स्विमिंग पूल अनधिकृत असल्याचे उघडकीस येऊन देखील महापालिका मात्र त्यावर तोडक कारवाई करत नव्हती. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ६ वर्षीय गीतिकाच्या बळी ला कारणीभूत बेकायदा रिसॉर्ट व बांधकामा प्रकरणी लेखी तक्रार केली होती. 

गीतिकाच्या मृत्यू ला ५० दिवस उलटून गेल्या नंतर अखेर महापालिकेला त्या अनधिकृत स्विमिंग पुलावर कारवाईची जाग आली. शनिवारी पोलीस बंदोबस्तात महापालिकेने तो स्विमिंग पूल यंत्रांच्या सहाय्याने पूर्णपणे तोडून टाकला. आधीच ह्या अनधिकृत स्विमिंग पुलावर महापालिकेने कारवाई केली असती तर गीतिकाचे प्राण वाचले असते. गंभीर बाब म्हणजे बळी गेल्या नंतर देखील स्विमिंग पूल तोडण्यासाठी महापालिकेला ५० दिवस का लागले? असा सवाल नागरिकां मधून केला जात आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकSwimmingपोहणे