अंबरनाथमध्ये हॉटेलचा स्लॅब कोसळून ६ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 17:18 IST2018-12-16T17:18:30+5:302018-12-16T17:18:55+5:30
अंबरनाथमध्ये मोठ्याप्रमाणावर अनधिकृत बांधकामे करण्यात येत आहेत.

अंबरनाथमध्ये हॉटेलचा स्लॅब कोसळून ६ जखमी
अंबरनाथ : अंबरनाथ पूर्वेच्या शिवाजी चौकातील मोहन कॅफे हॉटेलचा स्लॅब कोसळला. हॉटेलच्या वरच्या मजल्यावर अनधिकृतपणे नुतनीकरणाचं काम सुरू होते. यामुळे स्लॅब कमकुवत झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अंबरनाथमध्ये मोठ्याप्रमाणावर अनधिकृत बांधकामे करण्यात येत आहेत. बांधकाम करताना किंवा नुतनीकरण करताना पालिकेला त्याची कल्पना देण्यात येत नाही. प्रशासनाला अंधारात ठेवून असे प्रकार सर्रास केले जातात. इमारतींमध्ये बदल केल्याने त्या कमकुवत होतात. असाच प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे.
या दुर्घटनेत विजय शिंदे (५०), ललिता शिंदे (५०), रुपेश शिंदे (३१), राकेश शिंदे (२९), नीलम शिंदे (२८) आणि श्रेयस शिंदे (६) हे जखमी झाले असून जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.