ठाण्यात ५.८४ मिमी पाऊस, शहरात ढगांच्या गडगडाटात पावसाची हजेरी

By अजित मांडके | Updated: November 9, 2023 23:00 IST2023-11-09T22:59:55+5:302023-11-09T23:00:32+5:30

गुरुवारी रात्री पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला जोराचा वारा सुरू झाला

5.84 mm rain in Thane, rain in the city with thunderstorms | ठाण्यात ५.८४ मिमी पाऊस, शहरात ढगांच्या गडगडाटात पावसाची हजेरी

ठाण्यात ५.८४ मिमी पाऊस, शहरात ढगांच्या गडगडाटात पावसाची हजेरी

ठाणे - हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला असताना, दिवाळीच्या तोंडावर ठाणे शहरात गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटात पावसाळा सुरुवात झाल्याने दिवाळी खरेदीसाठी गेलेल्या ठाणेकर नागरिकांची चांगली तारांबळ उडाली. एक तासात ५.८४ मिमी पावसाची नोंद झाली. 

गुरुवारी रात्री पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला जोराचा वारा सुरू झाला. त्याच वाऱ्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यानंतर अचानक गडगडाट होऊन पावसाळा सुरुवात झाली. त्यामुळे मार्केटमध्ये दिवाळीच्या खरेदी गेलेल्या ठाणेकर नागरिकांची चांगली धावपळ सह तारांबळ उडाल्याचे पाहण्यास मिळाले. दिवाळीच्या तोंडावर पडणारा पाऊस हा पावसाळ्यासारखा पडताना दिसत होता.

Web Title: 5.84 mm rain in Thane, rain in the city with thunderstorms

टॅग्स :Rainपाऊस