ठाण्यात ५५ फूट भिंत कोसळली; ४ कारसह सात दुचाकींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 12:56 IST2021-12-11T12:56:32+5:302021-12-11T12:56:53+5:30
Accident in Thane: ठाणे शहरातील मध्यभागी असलेल्या मल्हार सिनेमागृहासमोरील राजदीप सोसायटीची ५० ते ५५ फूट भिंत कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.

ठाण्यात ५५ फूट भिंत कोसळली; ४ कारसह सात दुचाकींचे नुकसान
ठाणे - शहरातील मध्यभागी असलेल्या मल्हार सिनेमागृहासमोरील राजदीप सोसायटीची ५० ते ५५ फूट भिंत कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. ही भिंत चार कारसह सात दुचाकी वाहनांवर पडल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. तसेच ती भिंत धोकादायक स्थितीत असल्याचे ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले. या घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ही आपत्ती विभागाने सांगितले आहे.