शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

शहापूर तलाठ्याच्या कुटुंबीयांना कोविडविम्याचे 50 लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 23:40 IST

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ती यांच्या पत्नी आरती यशवंतराव आणि मुले आर्या व आराध्य यांना ५० लाख रुपयांचा मदतीचा धनादेश सुपुर्द केला.

ठाणे : शहापूरचे तलाठी नितीन यशवंतराव यांचे कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण होऊन निधन झाले होते. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेले पन्नास लाखांच्या विम्याची रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना मंजूर झाली आहे. यानुसार, बुधवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ती यांच्या पत्नी आरती यशवंतराव आणि मुले आर्या व आराध्य यांना ५० लाख रुपयांचा मदतीचा धनादेश सुपुर्द केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे व आमदार दौलत दरोडा ऑनलाइन या कार्यक्रमात सहभागी झाले होते.कोविडचे विमा कवच मिळणारे राज्याच्या महूसल विभागातील हे पहिलेच प्रकरण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत महसूल विभागातील तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनाने कर्तव्यावर असताना मृत्यू झाला आहे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील वाहनचालक आत्माराम अलीमकर (सेवा वर्ग जिल्हाधिकारी कार्यालय) यांना सदर मदत मंजूर झाल्याचा शासन आदेश निर्गमित झाला आहे, तर शिपाई गोपाळ आगीवले यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनास सादर केलेला आहे.नितिन गुलाबराव यशवंतराव (४१) हे तलाठी सजा शहापूर या सजेवर २०१८ पासून कार्यरत होते. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रथम कोविड केअर सेंटरचे शहापूरमधील शिवाजीराव जोंधळे नॉलेज सिटी आसनगाव येथे उभे करण्याकामी तालुक्यातील मुख्यालय सजेचे तलाठी या नात्याने त्यांनी मोठी जबाबदारी सांभाळली. तदनंतर शिवाजीराव जोंधळे नॉलेज सिटी आसनगाव, ता.शहापूर येथे कोविड केअर सेंटरमधील सर्व सुविधांचा समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर होती. हे कर्तव्य पार पाडीत असताना, त्यांना दुर्दैवाने कोरोनाची लागण होऊन त्यांचे ११ ऑगस्टला निधन झाले. एरवी नागरिकांना सरकारी कामाचा वाईट अनुभव येताे. मात्र,  या घटनेतून सरकार आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल गंभीर असल्याचे दिसून येते.शासन खंबीरपणे उभेकोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये मोठ्या प्रमाणावर जोखीम पत्करून शासकीय यंत्रणा कर्तव्य बजावत आहे. या कर्मचाऱ्यांची सुरक्षा, तसेच त्यांच्यापश्चात त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत राज्य सरकार अतिशय गंभीर आहे. कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, त्यांना सर्वोतोपरी साहाय्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या