शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

मानसिक छळ प्रकरणी १५ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 3:24 AM

प्रशिक्षणार्थीने केली तक्रार, दोनच दिवसांपूर्वी घेतला होता प्रवेश

- हितेन नाईक पालघर : पालघरमधील डॉ. ढवळे मेमोरियल रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षण घेणाऱ्या एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा रूग्णालयाच्या १५ वरिष्ठ डॉक्टरांनी मानसिक छळ केल्याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सर्व आरोपी डॉक्टर अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.नाशिकची रहिवासी असलेल्या प्रियंका शुक्लानेएमडी होमियोपॅथी पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. ती डॉक्टर ढवळे रूग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दोन दिवसापूर्वी रु जू झाली होती.येथे प्रशिक्षण घेत असताना रुग्णालयात १४ नोव्हेंबर रोजी बैठक झाली. यातील काही वरिष्ठांसोबत आपली ओळख करून घेत असताना त्यातील काही डॉक्टरांनी गुरूवारी रात्री तिचा मानसिक छळ केला. यामुळे या विरोधात तिने या सर्व वरिष्ठ डॉक्टरांच्या विरोधात तक्र ार दाखल करण्याचे ठरवले.तिने शुक्रवारी तिच्यासोबत घडलेला प्रकार पालघर पोलीस ठाण्यात सांगितला. मात्र,या डॉक्टरांनी तक्रार करू नये म्हणून तिच्यावर दबाव टाकण्यास सुरूवात केल्याचे कळते. मात्र तिच्या नातेवाईकांनी तिला दिलेल्या पाठिंब्यामुळे व असला घृणास्पद प्रकार इतर डॉक्टरसोबत घडू नये म्हणून महिला डॉक्टरांच्या फिर्यादीवरून पालघर पोलिसांनी १५ डॉक्टरांविरोधात महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुजीत ठाकूर हे पुढील तपास करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत दोन डॉक्टरांचे जबाब नोंदवले असल्याचे ‘लोकमत’ ला सांगितले.शुक्ला यांनी संस्थेकडे भूमिका मांडली नसल्याचे महाविद्यालयाचे म्हणणेडॉ. प्रियंका शुक्ला या विद्यार्थीनीने आपले रॅगिंग झाल्याबाबत पोलिसात तक्र ार दाखल करण्यापूर्वी महाविद्यालयातील कुठल्याही अधिकाऱ्यांकडे आपली भूमिका मांडली नसल्याचा खुलासा ढवळे रूग्णालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आनंद कापसे यांनी केला आहे.नवीन बॅचच्या स्वागतासाठी रविवारी फ्रेशर्स पार्टी होणार असल्याने १४ नोव्हेंबर रोजी एक बैठक झाली. यात आपल्याला मानसिक त्रास देण्यात आला अशी डॉ. शुक्ला यांनी पालघर पोलिसात तक्रार दाखल करण्यापूर्वी कुठल्याही अधिकाºयांकडे आपली भूमिका मांडली नाही.अथवा त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या प्राचार्य व अँटी रॅगिंग सेनेच्या अध्यक्ष यांच्याशी बोलण्यास त्यांनी नकार दिल्याचे प्रभारी प्राचार्यांनी म्हटले आहे.या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांशी संस्थेने संपर्क साधला असता या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारचे रॅगिंग झाले नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. बैठकीमध्ये कोणत्याही प्रकारचे अश्लील संभाषण, कृती झाली नाही असे सर्व विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. ही बैठक हसत-खेळत झाल्याचेही ते म्हणाले. ढवळे संस्था विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी काळजी घेत असल्याचेही डॉ. कापसे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :doctorडॉक्टर