मीरा-भाईंदरमधून ५ बांगलादेशी अटकेत
By धीरज परब | Updated: January 18, 2025 21:27 IST2025-01-18T21:27:32+5:302025-01-18T21:27:45+5:30
Mira-Bhayander News: मीरा भाईंदर शहरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या ४ बांगलादेशी महिला व १ पुरुष अश्या ५ जणांना विविध भागातून अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष ने अटक केली आहे .

मीरा-भाईंदरमधून ५ बांगलादेशी अटकेत
मीरारोड - मीरा भाईंदर शहरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या ४ बांगलादेशी महिला व १ पुरुष अश्या ५ जणांना विविध भागातून अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष ने अटक केली आहे.
मीरारोडच्या दिपक रुग्णालय मागील होली कॉम्पलेक्स, युरेका क्लासेस जवळ ; मीरारोडच्या काशीगाव वेस्टर्न पार्क परिसरात बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची तसेच मीरारोडच्या नया नगर येथील अस्मिता क्लब जवळ कामासाठी काही बांगलादेशी नागरिक एकत्र जमत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांना मिळाली.
पथकाने गुरुवारी मिळालेल्या माहिती नुसार सापळे रचून ५ बांगलादेशी नागरिकांना अटक केली . त्यांच्या कडील चौकशीत बांगलादेशातून भारतात बेकायदा घुसखोरी करून ते मीरा भाईंदर शहरात काम कण्र्यासाठी आले असल्याचे समोर आले . या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात १ बांगलादेशी महिले विरुद्ध ; काशीगाव पोलीस ठाण्यात १ पुरुष व १ महिला अश्या २ बांगलादेशी विरुद्ध तर नया नगर पोलीस ठाण्यात २ बांगलादेशी महिलां विरुद्ध पासपोर्ट अधिनियमा सह विदेशी व्यक्ती अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल केले गेले आहेत .