4971 corona patients were found in Thane district; 26 killed | ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४९७१ रुग्ण आढळले; २६ जणांचा मृत्यू 

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४९७१ रुग्ण आढळले; २६ जणांचा मृत्यू 

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे चार हजार ९७१ रुग्ण सोमवारी आढळून आले. गुढीपाडव्याच्या नूतन वर्षा प्रारंभी रुग्ण संख्येत तब्बल दीड हजार पेक्षा जास्त घट झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र मृतांची संख्या २६ ने वाढल्यामुळे चिंता वाढली आहे. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या तीन लाख ८५ हजार ६८ झाली असून आतापर्यंत सहा हजार ७३३ मृतांची संख्या आहे. ठाणे शहरात आजही एक हजार ३९४ रुग्ण सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ९५ हजार १३१ रुग्ण नोंदले असून आज सहा मृत्यू आहे. त्यामुळे मृतांची संख्या एक हजार ५११ झाली. कल्याण - डोंबिवलीत दोन दिवसाच्या तुलनेत रुग्ण संख्या कमी झालेली दिसत आहे. आज एक हजार ४१४ रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाल्याने या शहरातील एकूण एक हजार २९६ मृत्यूंची नोंद झाली आहे.

उल्हासनगरला आज १४३ रुग्ण आढळले असून दोन मृत्यू आहेत. आता या शहरात १६ हजार १७३ बाधीत झाले असून मृत्यू संख्या ३८८ आहे. भिवंडीला ९४ रुग्ण सापडले असून दोन मृत्यू झाले. येथे आठ हजार ७८२  बाधितांची तर, ३७४ मृतांची नोंद झाली आहे. मीरा भाईंदरला ३७४ रुग्ण सापडले असून सहा मृत्यू झाले आहेत. या शहरात आता ३५ हजार ३४६ बाधितांसह ८६६  मृतांची संख्या नोंदली आहे. अंबरनाथ शहरात २२८ रुग्ण आढळले असून  एकही मृत्यू नाही. या शहरात आता १३ हजार ८५३ बाधितांसह मृतांची संख्या ३२२ नोंद आहे. बदलापूरला २८८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण १४ हजार ९९१ असून एकही मृत्यू नसल्याने मृत्यूची संख्या १२६ नोंद आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात १३४ रुग्ण सापडले असून दोन मृत्यू आहेत. या गांवपाड्यांत २२ हजार ४४० बाधीत झाले असून मृत्यू ६२१ नोंद झाले
आहेत.
 

Web Title: 4971 corona patients were found in Thane district; 26 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.