शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

४२ कामगार हजेरी पुस्तकावरच ‘हजर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:11 IST

वेळेआधीच घरी : सत्ताधारी सदस्यांनीच केली पोलखोल, निलंबित करण्याची मागणी

कल्याण : केडीएमसीच्या कचरागाड्यांवरील सात चालक व ३५ कामगार सोमवारी सकाळी खंबाळपाडा येथील आगारात कामावर आले होते. मात्र, हजेरी पुस्तकावर ११ वाजताच ते दुपारी १ वाजताचे आउट टाइम टाकून घरी परतले. ही बाब सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी उघडकीस आणली असून, या कामगारांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, पुरेसे कामगार असतानाही कचरा उचलला जात नसल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले आहे.

खंबाळपाडा येथील बस डेपोसाठी आरक्षित असलेल्या जागेत कचरागाड्या उभ्या केल्या जातात. स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे व शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य विश्वनाथ राणे यांनी तेथे सकाळी ११.३० वाजता अचानक भेट दिली. तेथील कामगारांचे हजेरी पुस्तक तपासले असता सात कामगार कामावर हजर असल्याची नोंद होती. मात्र, हे कामगार कामावर हजर नव्हते. ते ११.३० वाजताच दुपारी १ वाजताची वेळ लिहून बाहेर पडल्याचे उघड झाले.

कचरा उचलणाºया एका आरसी गाडीवर एक वाहनचालक आणि पाच सफाई कामगार असतात. सात आरसी गाड्यांवरील सात चालकांची नोंद हजेरी पुस्तकावर होती. मात्र, या चालकांप्रमाणे ३५ सफाई कामगारांनी वाहनचालकांचाच कित्ता गिरवत १ वाजताची नोंद करून त्याआधीच घर गाठले होते. हा प्रकार पाहून सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शहरात ठिकठिकाणी कचरा उचलला जात नाही. कामगार हजेरी लावून पळ काढतात, हा काय प्रकार आहे, याचा जाब विचारण्यासाठी त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अमित पंडित व अधिकारी विलास जोशी यांना तेथे पाचारण केले. ते आल्यानंतर उपायुक्तांचे कामगारांवर नियंत्रण नाही. त्यामुळे हे प्रकार घडत आहेत, असा आरोप सदस्यांनी केला. उपायुक्त व आयुक्तांनी कामगारांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. ते नसल्याने कामगार हजेरी लावून कचरा उचलण्याचे काम केल्याचे भासवत आहे. आरोग्य निरीक्षकांची त्यांना साथ आहे. कामगार व अधिकारी नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. अधिकारी व कामगारांच्या विरोधात कडक कारवाई करावी. तसेच या कामगारांना सेवेतून तातडीने निलंबित करावे, अशी मागणी केली. त्यावर या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पंडित यांनी सांगितले.अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोपमहापालिकेने चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे १०७ कोटी रुपयांचे कंत्राट आर अ‍ॅण्ड डी कंपनीला दिले आहे. ओला-सुका कचरा वेगळा गोळा करून त्याची वाहतूक करणे, याचा समावेश आहे.या कंत्राटामुळे चार प्रभाग क्षेत्रांतील कामगार अन्य सहा प्रभाग क्षेत्रांत कामाला लावता येतील, असा त्यामागील विचार होता. मात्र, कामगार हजेरी लावून घरी पळ काढतात. त्यामुळे शहरात कचºयाची समस्या कायम आहे. त्याला अधिकारी जबाबदार आहेत. तसेच कंत्राटदाराने गणवेश व सुरक्षेची साधने पुरविलेली नाहीत, याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले आहे.