शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

मानस बिल्डर्सला ४० हजारांचा दंड

By admin | Updated: June 29, 2017 02:49 IST

कायदेशीर कागदपत्रांच्या पूर्तता न करण्याबरोबरच गृहनिर्माण संस्थेला इतरही सोयीसुविधा न पुरवता सदोष सेवा देणाऱ्या मानस बिल्डर्स

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कायदेशीर कागदपत्रांच्या पूर्तता न करण्याबरोबरच गृहनिर्माण संस्थेला इतरही सोयीसुविधा न पुरवता सदोष सेवा देणाऱ्या मानस बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ४० हजाराचा दंड सुनावला असून इतर सर्व अपूर्ण बाबी पूर्ण करून देण्याचे आदेश दिले आहेत.मानस रेसिडेंसी गृहनिर्माण संस्था आॅक्टोबर २०१४ रोजी स्थापन करण्यात आली आहे. ही संस्था सदस्यांनी असहकाराच्या तत्वावर स्थापन केली असली तरी मानस बिल्डर्सने त्या सदनिका त्यांना विकून स्वाक्षरित करारनामे केले आहे. बिल्डर्सने ओ.सी मिळवणे, कन्व्हेअन्स डिड करून देणे, संस्था स्थापन करणे या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या नाही. तसेच मान्य केलेल्या इतर सुविधा पुरविलेल्या नाही. त्यामुळे बिल्डर्सविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना अधिकार देण्याचा ठराव फेब्रुवारी २०१५ च्या विशेष सभेमध्ये झाला. त्यानुसार गृहनिर्माण संस्थेने बिल्डर्सविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली. कागदपत्र पुरावे यांची पडताळणी केली असता बिल्डर्सने प्रत्येक सदस्याकडून शुल्क घेऊनही संस्था स्थापन केली नाही किंवा ते पैसे प्राधिकरणाला भरल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे सदस्यांनी स्वखर्चाने संस्था स्थापन केली. तसेच संस्थेची स्थापना झाल्यापासून चार महिन्यात कायद्यानुसार संस्थेच्या नावे भूखंडाचे कन्व्हेअन्स डीड करून दिले नाही. इमारतीस ओ.सी घेतलेली नाही. एकंदरीतच मोफा कायद्याचे उल्लंघन बिल्डर्सने केल्याचे मंचाने म्हटले आहे. संस्थेला रेनवॉटर हार्वेस्टिंगची सुविधा दिली असली तरी त्यात त्रुटी आहेत. तसेच सोलार सिस्टम देण्याचे कबूल करूनही न दिल्याने संस्थेने स्वखर्चाने विकत घेतल्याचे बिल्डर्सने मान्य केले आहे. ते विकत घेतल्याचे इनव्हॉइस मंचात आहे. त्यामुळे एकंदरीतच बिल्डर्सने मानस रेसिडेंन्सी गृहनिर्माण संस्थेला सदोष सेवा दिल्याचे मंचाने स्पष्ट केले.