शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 21:50 IST

मीरा रोड - शेजारची लहान मुलं दाराजवळ घाण करतात म्हणून एका ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण करत कच-याच्या ढिगा-यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना भार्इंदरमध्ये घडली आहे.

मीरा रोड - शेजारची लहान मुलं दाराजवळ घाण करतात म्हणून एका ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण करत कच-याच्या ढिगा-यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना भार्इंदरमध्ये घडली आहे. नवघर पोलिसांनी तिच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी शेजारी राहणा-या १९ वर्षीय तरुणास अटक केली आहे.आझाद नगर परिसरात महापालिकेच्या मालकीचा आरक्षित भूखंड असून त्या ठिकाणी बेकायदा झोपड्या, बांधकामे, कच-याची गोदामे आदी अतिक्रमण झालेले आहे. सदर ठिकाणी कच्च्या झोपडीत इसरार शेख हे पत्नी व प्रत्येकी दोन मुलगे व दोन मुलींसह राहतात. शेजारीच असलेल्या कच्च्या झोपड्यात काही कचरा-भंगार गोळा करणारे एकत्र मिळून राहतात. इसरार यांची मुलं लहान असल्याने ते लघुशंका आदी शेजारच्या झोपड्यांजवळ करत असल्याने त्यावरून रहिम शौकत अली शेख (१९) ह्याचे इसरार यांच्याशी भांडण होत असे. रहिम हा लहान मुलांना देखील दमदाटी, शिवीगाळ करत असे.मंगळवारी रात्री ९च्या सुमारास इसरार यांची ४ वर्षांची मुलगी आफरीन ही दिसत नसल्याने घरच्यांसह परिसरातील रहिवाशांनी तिच्या शोधासाठी धापवळ सुरू केली. आफरीन बेपत्ता असल्याचे नवघर पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंह रह उपनिरीक्षक विजय टक्के, गिरीश भालचीम व अन्य पोलीस कर्मचा-यांनी देखील शोधाशोध सुरू केली.रात्रीच्या वेळेत पोलीस व रहिवाशांनी आझादनगर परिसरा सह उड्डाणपुलाखाली, इंद्रलोक झोपडपट्टी आदी सर्व परिसर पिंजून काढला. पण आफरीनचा कुठे शोध लागला नाही. दुसरी कडे संशयित रहिमसुद्धा बेपत्ता झाला होता. आझाद नगर मस्जिद मागील कच-याच्या ढिगा-यातून विव्हळण्याचा आवाज तेथील एका रहिवाशाला आल्यानंतर पोलीस व अन्य लोकांनी धाव घेत पाहणी केली असता आफरीन ही जखमी व रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली आढळून आली. तिला नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, तिच्या डोक्यावर, चेह-यावर जखम झालेली आहे. डोक्याला ५ ठिकाणी जखमा झाल्या आहेत. पोलीस व रहिवाशी हे रहिमचा शोध घेत असताना अनिस खान ऊर्फ मुन्ना, सलीम मनिहार आदींना रहिम हा क्रीडा संकुलामागील भागात लपलेला दिसून आला. लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.आफरीन रात्री लघुशंकेसाठी गेली असता रहिमने तिला हटकले व रागाच्या भरात डोक्यावर रॉडने मारले. नंतर तिला कच-यात टाकून दिल्याची कबुली त्याने पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.हत्या व गुन्ह्यांना महापालिका जबाबदार ?आझाद नगर व मागील परिसर हा खेळाचे मैदान, सामाजिक वनीकरण आदी पालिका आरक्षणाखाली राखीव असून, मोठ्या प्रमाणात पालिकेने टिडीआर देऊन जागा मिळवली आहे. परंतु या ठिकाणी झोपड्या, बांधकामे, भंगार व कचरयाची गोदामे आदींचे सर्रास अतिक्रमण झालेले असताना देखील पालिका मात्र केवळ बघ्याची भुमिका घेत या अतिक्रमणांना पाठीशी घालत आहे. या आधी एका ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तीची हत्या करुन मृतदेह याच भागात टाकण्यात आला होता. पवई येथुन अपहरण करुन आणलेल्या १० वर्षाच्या मुलास देखील येथे मारुन टाकण्यात आले होते. तरी देखील पालिकेने या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात केले नसुन भुखंड देखील कुंपण घालुन ताब्यात घेतलेला नाही. पालिकेच्या डोळेझाक पणा मुळे येथे गंभीर स्वरुपाचे गुन्हे मात्र सतत घडत असल्याने लोकां मध्ये संताप व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरmira roadमीरा रोड