उल्हासनगरात ४ बांग्लादेश नागरिकांना अटक
By सदानंद नाईक | Updated: January 21, 2023 16:09 IST2023-01-21T16:09:10+5:302023-01-21T16:09:47+5:30
कॅम्प नं-४ कृष्णानगर येथे दडून बसलेल्या ४ बांग्लादेशी नागरिकांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली.

उल्हासनगरात ४ बांग्लादेश नागरिकांना अटक
सदानंद नाईक, उल्हासनगर: कॅम्प नं-४ कृष्णानगर येथे दडून बसलेल्या ४ बांग्लादेशी नागरिकांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली. वैध परवानगी कागदपत्र विना राहणाऱ्या घुसखोर बांग्लादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ कृष्णानगर परिसरात घुसखोरी बांग्लादेशी नागरीक राहत असल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाला मिळाली होती. पथकाने विठ्ठलवाडी पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान कारवाई करीत चौघांना अटक केली. त्यांच्या सोबत अन्य साथीदार असल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. खलील मनताज मंडल, लिटन जिन्नत शेख, शुकर खातून शेख व नाजीमा अली नाजीर हजहर अश्या चार बांग्लादेशी नागरिकांना अटक करून त्यांच्यावर घुसखोरी केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यांच्या सोबत त्यांचे साथीदार असल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत असून त्या दृष्टिकोनातून चौकशी करण्यात येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"