ठाणे जिल्हयाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल ३४७ रुग्ण नव्याने दाखल तर सात जणांचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 20:37 IST2020-12-14T20:36:33+5:302020-12-14T20:37:40+5:30
विशेष म्हणजे भिवंडी, मीरा भार्इंदर, अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे ग्रामीण भागात सोमवारी एकाही मृत्युची नोंद न झाल्याने आरोग्य विभागामध्ये समाधान व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात आता दोन लाख ३६ हजार ५५६ बाधितांची तर पाच हजार ८२३ मृत्युची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्हयात रविवारच्या तुलनेत सोमवारी कोरोना बाधितांची संख्या मोठया प्रमाणात घटली आहे. जिल्हाभर ३४७ रु ग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात आता दोन लाख ३६ हजार ५५६ बाधितांची तर पाच हजार ८२३ मृत्युची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात १०२ बाधितांची तर दोघांच्या मृत्युची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ५३ हजार ५२७ तर एक हजार २७३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ६२ रु ग्णांची तसेच एकाच्या मृत्यूची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीत ८७ बाधित झाले असून एकाच्या मृत्यूची नोंद झाली. मीरा भार्इंदरमध्ये २८ रु ग्ण नव्याने दाखल झाले. भिवंडी महापालिका क्षेत्रात तर अवघ्या एका रूग्णाची नोंद झाली. उल्हासनगरमध्ये आठरु ग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यु ओढवला आहे. अंबरनाथमध्येही अवघे सहा रुग्ण बाधित झाले. तर बदलापूरमध्ये २८ रु ग्णांची नोंद झाली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात दहा रु ग्णांची नोंद झाल्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या १८ हजार ४७७ इतकी झाली आहे. विशेष म्हणजे भिवंडी, मीरा भार्इंदर, अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे ग्रामीण भागात सोमवारी एकाही मृत्युची नोंद न झाल्याने आरोग्य विभागामध्ये समाधान व्यक्त होत आहे.