शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ३२१ नवे रुग्ण; सहा जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2021 8:54 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: ठाणे परिसरात १२८ रुग्ण आढळून आले आहेत. या शहरात ५५ हजार ८८७ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली

ठाणे - जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे ३२१ रुग्ण नव्याने सापडले आहेत. आता जिल्ह्यात दोन लाख ४४ हजार ५७१ रुग्ण झाले आहेत. तर, सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ९८५ झाली आहे. ठाणे परिसरात १२८ रुग्ण आढळून आले आहेत. या शहरात ५५ हजार ८८७ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली. तर, दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे एक हजार ३१३ मृतांची संख्या या शहरा झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत ६३ रुग्णांची वाढ असून दोन मृत्यू आहेत. आता येथे ५७ हजार ८०७ रुग्ण बाधीत झाले असून एक हजार ११० मृतांची नोंद आहे. 

उल्हासनगरात सात नवे रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात ११ हजार ३९५ बाधीत झाले असून ३६१ मृतांची संख्या नोंदवण्यात आली आहे. भिवंडीला दोन बाधीत सापडले असून एकही मृत्यू नाही. आता या शहरात बाधीत सहा हजार ६१६ झाले असून मृतांची संख्या ३५२ आहे. मीरा भाईंदरमध्ये ३८ रुग्ण सापडले असून एका मृत्यूची नोंद आहे. आता बाधितांची संख्या २५ हजार ५३५ झाली असून मृतांची संख्या ७८४ आहे. 

अंबरनाथमध्ये १० रुग्ण वाढले असून एकही मृत्यू नाही. या शहरात बाधितांची संख्या आठ हजार २८६ झाली असून मृत्यू ३०५ झाले आहेत. बदलापूरमध्ये १३ रुग्ण सापडल्यामुळे आता बाधीत आठ हजार ९३१ झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू न झाल्याने मृतांची ११९ आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीणमध्ये चार रुग्णांची वाढ असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत १८ हजार ७९८ असून आतापर्यंत मृतांची संख्या ५८१ आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे