कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवे 30 रुग्ण, एक महिन्याच्या बालिकेचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 19:32 IST2020-05-18T19:24:33+5:302020-05-18T19:32:08+5:30

एकूण रुग्ण संख्या झाली 530

30 new corona patients in Kalyan Dombivali, including a one-month-old baby girl MMG | कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवे 30 रुग्ण, एक महिन्याच्या बालिकेचा समावेश

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवे 30 रुग्ण, एक महिन्याच्या बालिकेचा समावेश

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे 30 नवे रुग्ण आढळून आले आहे. नव्या रुग्णांमध्ये एक महिन्याच्या बालिकेचा समावेश आहे. ही बालिका कल्याण पश्चिमेतील आदर्श कॉलनीतील आहे. नवे रुग्ण धरुन कोरोना रुग्णांची एकूण संख्या  530 झाली आहे.

डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी परिसरातील एका तीन वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर डोंबिवली पश्चिमेतील 13 आणि 15 वर्षीय मुलाला कोरोना झाला आहे. याशिवाय कल्याण पूव्रेतील 16 वर्षीय तरुणीला कोरोनाची बाधा झाली आहे. कल्याण पूव्रेत 8 जण, कल्याण पश्चिमेत 6 जण, डोंबिवली पूव्रेत 3 जण, डोंबिवली पश्चिमेत 12 जण आणि आंबिवलीत एक जण कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. या 30 रुग्णांपैकी 18 पुरुष व 6 महिला रुग्णांचा समावेश आहे. आत्तार्पयत एकूण उपचार घेत असलेल्या 196 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 323 आहे. उपचार घेऊन बरे होणा:या रुग्णांचे प्रमाण 37 टक्के आहे.

Web Title: 30 new corona patients in Kalyan Dombivali, including a one-month-old baby girl MMG