कल्याण: शाळेची भिंत कोसळल्यानं कल्याणमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मुसळधार पावसानं नॅशनल उर्दू स्कूलची भिंत कोसळली. ही भिंत शेजारी असलेल्या झोपड्यांवर कोसळल्यानं दोन महिला आणि एका तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 16 वर्षीय मुलीय जखमी झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बचाव पथकानं दुर्घटनेत मृत्यूमुखी पावलेल्या तिघांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. यावेळी स्थानिक पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. शोभा कांबळे (वय 60 वर्षे), करीना मोहम्मद चंद (वय वर्षे 25) आणि हुसेन मोहम्मद चंद (वय वर्षे 3) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं आहेत. तर आरती राजू कर्डिले (वय वर्षे 16) असं जखमी मुलीचं नाव आहे. तिच्यावर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुसळधार पावसामुळे कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 07:53 IST