ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे २८५ रुग्ण आढळले; एकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 20:54 IST2021-02-15T20:53:50+5:302021-02-15T20:54:10+5:30

ठाणे : जिल्ह्यात सोमवारी गेल्या २४ तासात कोरोनाचे २८५ रुग्ण आढळले एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ...

285 corona patients found in Thane district; Death of one | ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे २८५ रुग्ण आढळले; एकाचा मृत्यू 

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे २८५ रुग्ण आढळले; एकाचा मृत्यू 

ठाणे : जिल्ह्यात सोमवारी गेल्या २४ तासात कोरोनाचे २८५ रुग्ण आढळले एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ५८ हजार ३० रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या सहा हजार २०६ झाली आहे.  
 
ठाणे शहरात ७८ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६० हजार २०१ झाली आहे. शहरात एकाच मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३७१ झाली. कल्याण - डोंबिवलीत ८३ रुग्णांची वाढ झाली असून  मृत्यू नाही. आता ६१ हजार २३० रुग्ण बाधीत असून एक हजार १८० मृत्यूची नोंंद आहे. 

उल्हासनगरमध्ये तीन रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ७०५ झाली. तर, ३६८ मृतांची संख्या आहे. भिवंडीला तीन बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ७४४ असून मृतांची संख्या ३५४ आहे. मीरा भाईंदरमध्ये ३१ रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. या शहरात  बाधितांची संख्या २६ हजार ५८८ असून मृतांची संख्या ८०१ आहे.

अंबरनाथमध्ये दोन रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. येथे बाधीत आठ  हजार ६५४ असून मृत्यू ३१२ आहेत. बदलापूरमध्ये १६ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार ५५९ झाले असून एकही मृत्यू नाही. मृत्यूची संख्या १२५ आहे. ग्रामीणमध्ये तीन रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत १९ हजार ३३२ आणि आतापर्यंत ५९१ मृत्यू झाले आहेत.

Web Title: 285 corona patients found in Thane district; Death of one