शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

कंटेनमेंट झोन २८० च्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 12:46 AM

ठाणे महापालिका क्षेत्र : साहाय्यक आयुक्तांना दिले झोनची हद्द ठरविण्याचे अधिकार

ठाणे : लॉकडाउन उघडण्याचा पहिला टप्पा जाहीर झाला असून तो कंटेनमेंट झोन वगळून असणार आहे. मात्र, शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून ठामपा हद्दीतील कंटेनमेंट झोनही वाढत आहेत. सध्या या झोनची संख्या २८० च्या घरात असल्याची माहिती मनपाने दिली. तसेच, या झोनची हद्द ठरवण्याचे अधिकार सहाय्यक आयुक्तांना दिल्याचे या आदेशात म्हटले आहे.शहरातील प्रत्येक प्रभाग समितीत हे झोन आहेत. कोणते भाग सुरू करणार याबाबत ५ जूननंतरच स्पष्ट होणार आहे. आठ दिवसांत कंटेनमेंट झोनमध्ये ४५ ची भर पडली आहे. २६ मे पर्यंत २३५ कंटेनमेंट झोन होते. शहरात टेस्ट करण्याचे प्रमाण वाढल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. ज्या-ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे ते भाग कंटेनमेंट झोन म्हणून प्रशासनातर्फे घोषित केले आहेत. यात वागळे इस्टेट, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ मुंब्रा, नौपाडा, कोपरी या भागांतही कंटेनमेंट झाले वाढले आहेत. कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात सम-विषम तारखेनुसार व्यवहार सुरळीत होणार आहेत. कंटेनमेंट झोनची हद्द ठरवण्याचे अधिकार हे आता सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत.उल्हासनगरमध्ये चार कोरोनाबाधितांचा मृत्यूउल्हासनगर : उल्हासनगरमध्ये बुधवारी १५ नवे रुग्ण आढळून आले असून चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास मोहनालकर यांनी दिली आहे. आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू, तर १७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कॅम्प नं. २ परिसरात चार, कॅम्प नं. ३ परिसरात पाच आणि कॅम्प नं. ४ परिसरात तीन, तर कॅम्प नं. ५ मध्ये दोन रुग्ण आढळले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस