शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांचे पाणी एमआयडीसी तोडणार?

By admin | Updated: February 17, 2016 02:02 IST

अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे आधीच ३० टकके पाणीकपातीचे संकट ओढवले असताना कोट्यवधींच्या थकबाकीप्रकरणी एमआयडीसीने केडीएमसीत समावेश झालेल्या २७ गावांना नोटीस बजावली आहे

कल्याण : अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे आधीच ३० टकके पाणीकपातीचे संकट ओढवले असताना कोट्यवधींच्या थकबाकीप्रकरणी एमआयडीसीने केडीएमसीत समावेश झालेल्या २७ गावांना नोटीस बजावली आहे. ३१ मार्चपूर्वी थकीत बिले नाही भरली तर तेथील पाणीपुरवठा खंडीत करू असा पवित्रा एमआयडीसीने घेतल्याने आता पाणी बंद करण्यावरून संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे आहेत.गेल्या वर्षी जूनला या गावांचा केडीएमसीत समावेश झाला. २००२ मध्ये गावे वगळल्यानंतर आजतागायत पाणीपुरवठ्याच्या बिलांची थकबाकी १०० कोटीच्या आसपास आहे. ज्यावेळेस गावांचा कारभार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू होता त्यावेळेस थकीत बिलांसंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु, २००८ मध्ये बिलापोटी ३२ लाख रूपयांचा केलेल्या भरणा व्यतिरिक्त कोणतीही थकबाकी अद्यापपर्यंत भरली गेलेली नसल्याकडे एमआयडीसी डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर जगताप यांनी लक्ष वेधले आहे. २७ गावांपैकी आशेळे- माणेरे आणि दावडी या गावांनी थकीत बिले भरली असून सर्वाधिक सव्वाआठ कोटींची थकबाकी भोपर गावाची आहे.यापूर्वी जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला असून सद्यस्थितीत केडीएमसीला देखील वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याचे जगताप म्हणाले. राजकीय दबावामुळे यापूर्वीची कारवाई ठोसपणे केली नसल्याची कबूली देत थकीत बिलांसाठी दीड महिन्यांचा कालावधी दिला आहे. बिले न भरल्यास पाणीपुरवठा खंडीत करण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचे जगताप म्हणाले. थकीत पाणी बिलासंदर्भात दोन वेळा खा. डॉ श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर बैठक झाली असून बिले भरण्याबाबत जि.प.अथवा केडीएमसीने जबाबदारी घ्यावी.