ठाण्यात रंगणार २६ वा क्र ीडा महोत्सव; ११ फेब्रुवारीला मिनी मॅरेथॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 20:21 IST2018-02-06T20:16:32+5:302018-02-06T20:21:40+5:30

26th edition of the festival to be held in Thane; Mini Marathon on 11th February | ठाण्यात रंगणार २६ वा क्र ीडा महोत्सव; ११ फेब्रुवारीला मिनी मॅरेथॉन

ठाण्यात रंगणार २६ वा क्र ीडा महोत्सव; ११ फेब्रुवारीला मिनी मॅरेथॉन

ठळक मुद्देआंतरशालेय खोखो, कबड्डी, फुटबॉलचे सामने होणार१० ते १५ वयोगटातील मुले, मुलींसाठी ३.५ किलोमीटर अंतराची मिनी मॅरेथॉन


ठाणे : येथील मुकंद लिमीटेडच्या मुकंद स्पोर्ट्स क्लबतर्फे यंदाही २६ व्या क्र ीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्र ीडा महोत्सवातंर्गत येत्या ११ फेब्रुवारी रोजी आंतरशालेय मिनी मॅरेथॉन, २२ ते २३ फेब्रुवारीला आंतरशालेय खो-खो आणि कबड्डी तसेच २३ फेब्रुवारीला आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा आयोजिण्यात आल्या आहेत.
मुकंद स्पोर्ट्स क्लब आयोजित १० ते १५ वयोगटातील मुले, मुलींसाठी ३.५ किलोमीटर अंतराची मिनी मॅरेथॉन स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेला क्लबच्या क्रीडांगण येथून प्रारंभ होणार असून, तेथेच तिची सांगता होणार आहे. या स्पर्धेच्या दोन्ही गटातील पहिल्या १० क्र माकांच्या विजेत्यांना रोख पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. त्यात पहिल्या क्र मांकासाठी १३०० रु पये, दुस-या क्र माकांसाठी ११०० रु पये आणि तिस-या क्र मांकासाठी एक हजार रु पयांचे रोख पुरस्कार असणार आहे. याशिवाय २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मुले, मुलींसाठी आंतर शालेय खो खो आणि कबड्डी स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. सर्व स्पर्धांमध्ये मर्यादित प्रवेश देण्यात येणार असल्याचे मुकंद स्पोर्ट्स क्लबचे सचिव राजेश पवार यांनी सांगितले.
 

Web Title: 26th edition of the festival to be held in Thane; Mini Marathon on 11th February