ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे २६६ नवे रुग्ण; पाच जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 08:27 PM2021-01-23T20:27:02+5:302021-01-23T20:28:22+5:30

Coronavirus in Thane : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे २६६ रुग्ण शनिवारी आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

266 new corona patients found in Thane district today; Five people died | ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे २६६ नवे रुग्ण; पाच जणांचा मृत्यू 

ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे २६६ नवे रुग्ण; पाच जणांचा मृत्यू 

Next

ठाणे - जिल्ह्यात कोरोनाचे २६६ रुग्ण शनिवारी आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यातील रुग्ण संख्या दोन लाख ५१ हजार ६४१ झाली असून मृतांची संख्या सहा हजार १०९ झाली आहे. 

ठाणे शहरात ९२ बाधीत सापडल्याने या शहरात आता ५८ हजार ३०९ एकूण रुग्ण संख्या झाली आहे. दोघांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३५० झाली. कल्याण - डोंबिवलीत ५४  रुग्णांची वाढ झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. या शहरात ५८ हजार ५५७ रुग्ण बाधीत असून एक हजार १४९ मृत्यू आजपर्यंत झाले आहे.

उल्हासनगरला पाच रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. या शहरातील बाधितांची संख्या ११ हजार ५६७ नोंदली असून मृतांची संख्या ३६६ आहे. भिवंडीला एक बाधीत आढळला असून मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ६८२ असून मृतांची संख्या ३५२ आहे. मीरा भाईंदरमध्ये २० रुग्णांची वाढ असून मृत्यू झाला नाही. या शहरात आता बाधितांची संख्या २६ हजार १३८ असून मृतांची संख्या ७९५ आहे.

अंबरनाथला १० रुग्णांची नव्याने वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत आठ हजार ५१२ झाले असून मृतांची संख्या ३१० आहे. बदलापूरमध्ये १२ रुग्ण सापडल्यामुळे आता बाधीत नऊ हजार २५६ झाले. या शहरात एकही मृत्यू न झाल्यामुळे मृतांची संख्या १२० आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांंत तीन रुग्ण नव्याने वाढले असून एकही मृत्यू नाही. ग्रामीण भागात आता १९ हजार ७४ बाधीत झाले असून ५८५ मृत्यू झाले आहेत.

Web Title: 266 new corona patients found in Thane district today; Five people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.