म्हात्रेनगरच्या चित्रकला स्पर्धेमध्ये २५८ चित्रकारांचा सहभाग, जादुच्या प्रयोगाला विशेष पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 08:53 PM2019-12-25T20:53:18+5:302019-12-25T20:54:18+5:30

सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत बालभवन येथे स्पर्धा संपन्न झाली असून त्यासाठी ४ गट ठेवण्यात आले होते.

258 artists participate in painting competition in Mhatre nagar | म्हात्रेनगरच्या चित्रकला स्पर्धेमध्ये २५८ चित्रकारांचा सहभाग, जादुच्या प्रयोगाला विशेष पसंती

म्हात्रेनगरच्या चित्रकला स्पर्धेमध्ये २५८ चित्रकारांचा सहभाग, जादुच्या प्रयोगाला विशेष पसंती

Next

डोंबिवली: दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी म्हात्रेनगरनध्ये विनामूल्य चित्रकला स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी त्याचे आयोजन केले होते त्यास परिसरातील २५८ चित्रकारांनी सहभाग घेतला होता.

सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत बालभवन येथे स्पर्धा संपन्न झाली असून त्यासाठी ४ गट ठेवण्यात आले होते. पहीली ते दुसरी, ३री ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी असे शाळेचे चार गट होते. पहिल्या गटात अनन्या बोगा, हर्ष ठाकुर, जुही ठाकुर यांनी प्राविण्य मिळवले. दुस-या गटात वैष्णवी नलावडे, पियुष घोराई, क्रिशा पाटील यांनी प्राविण्य मिळवले.

तिस-या गटात श्रीलेखा बोगा, शाल्मली दुर्वे, आर्या सामंत यांनी तर चौथ्या गटात अनुष्का जाधव, ईषा सामंत, श्रेयसी दुर्वे यांनी यश मिळवले. या सर्व गटांना अनुक्रमे प्रथम,द्वितीत, तृतीय अशी बक्षिस देऊन सन्मानीत करण्यात आके. त्यांच्या व्यतिरीक्त प्रत्येक गटात उत्तेजनार्थ तीन परितोषिक देण्यात आले. खुल्या गटासाठी स्वतंत्रपणे स्पर्धा होती, त्यात प्रफुल साने, अनिषा जाधव, अथर्व यादव यांना अनुक्रमे पारितोषिक मिळाल्याची माहिती स्पर्धा आयोजन समितीचे अमित कासार यांनी दिली.

पहिल्या गटासाठी फुले व फुलपाखरु, पाण्यातील जहाज. दुस-या गटासाठी फुलदाणी व फुले, आवडते प्राणी, पक्षी. तिस-या गटासाठी पावसाळयातील प्रसंग, रस्त्याची साफसफाई करणारे विद्यार्थी, चंद्रयान. चौथ्या गटासाठी पूरग्रस्तांना मदत करणारे नागरिक, आजीआजोबांसमवेत सहलीतील प्रसंग, तुमच्या स्वप्नातील मेट्रो असे विषय स्पर्धेचे आयोजक पेडणेकर समितीने दिले होते.

खुल्या गटासाठी भारतरत्न माजी पंतप्रधान वाजपेयी यांचे पोर्ट्रेट (बघुन काढु शकण्याची सूट)आणि  प्रदुषण मुक्त कल्याण डोंबिवली पोस्टर असे दोन विषय देण्यात आले होते. आयोजकांतर्फे ड्रॉईंग पेपर, व अल्पोपहार देण्यात आले होेते. सहभागींनी त्यांचे रंगसाहित्य सोबत आणण्याची अट होती. सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धा संपन्न झाल्यावर लगेचच दुपारी बक्षिस वितरण समारंभाचेही आयोजन करण्यात आले होते. म्हात्रे नगरमधील ज्येष्ठ नागरिक, भाजपच्या महिला आघाडी प्रमुख पुनम पाटील, मंडल सरचिटणीस रवीसिंग ठाकुर आदींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेनंतर तासभर जादुचे प्रयोग हा कार्यक्रम संपन्न झाला, सहभागी विद्यार्थ्यांसह अनेकांनी त्याचा आनंद लुटला.

Web Title: 258 artists participate in painting competition in Mhatre nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.