लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: केरळ राज्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेकडून महाराष्टÑ राज्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत २५ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बँकेच्या वतीने मंगळवारी सुपूर्द करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील आणि उपाध्यक्ष भाऊ कु-हाडे यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते.सामाजिक बांधिलकी आणि माणूसकीच्या दृष्टीकोनातून केरळच्या पूरग्रस्तांना बँकेच्या वतीने मदत करण्याचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने करण्यात आला होता. या ठरावानंतर अध्यक्ष पाटील आणि उपाध्यक्ष कु-हाडे यांच्यासह मुरबाडचे आमदार किसन कथोरे, ठाण्याचे आमदार संजय केळकर, संचालक राजेश सावळाराम पाटील, बाबाजी पाटील, अनिल मुंबईकर आणि बँकेचे कार्यकारी अधिकारी भगिरथ भोईर यांनी १६ आॅक्टोंबर रोजी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनात हा २५ लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. बँकेला २०१६- २०१७ करिता देशात दुसऱ्या क्रमांकाचा तर राज्यात प्रथम क्रमांकाचा बँको अॅवार्ड बँकेस प्राप्त झाला आहे. ३० सप्टेंबर २०१८ अखेर ३४ हजार ३८७ स्वयं सहाय्यता बचतगट बँकेशी संलग्न असून सप्टेंबर अखेर बँकेकडे बचत गटांच्या ठेवींची रक्कम ५८ कोटी इतकी आहे. १६ हजार ४४१ बचत गटांना १२२ कोटींचा कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. बँकेच्या ३७ हजार ५०१ सभासदांना १३० कोटींची कर्ज माफी मिळालेली आहे. चालू खरीप हंगामात बँकेला दिलेल्या १८० कोटींच्या लक्षांकापैकी १२७ कोटींचे अर्थाक ७१ टक्के पीक कर्ज वाटप केल्याची माहिती बँकेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.दोन हजार ८५४ कोटींच्या कर्जाचे वाटपठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवी ३१ मार्च २०१८ अखेर सहा हजार २६२ कोटी इतक्या होत्या. त्यामध्ये २४८ कोटींची वाढ होऊन ३० सप्टेंबर अखेर बँकेच्या एकूण ठेवी सहा हजार ५१० कोटी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे ३० सप्टेंबर २०१८ अखेर दोन हजार ८५४ कोटींच्या कर्जाचं वाटप झाल्याचेही बँकेचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
केरळच्या पूरग्रस्तांसाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची २५ लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 21:29 IST
अतिवृष्टीमुळे केरळमधील रहिवाशांना मोठा फटका बसल्यामुळे येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी करोडो रुपयांची गरज आहे. याच मदतीसाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेनेही पुढाकार घेत २५ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविला आहे.
केरळच्या पूरग्रस्तांसाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची २५ लाखांची मदत
ठळक मुद्देमुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत होणार मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्दआमदारांसह संचालक मंडळाची हजेरी