शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या दहिसर येथील धाडीत १४ बारबालांसह २४ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 21:59 IST

लेडिज सर्व्हिसच्या नावाखाली अश्लील चाळे करून रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बारमध्ये ग्राहकांना आकृष्ट करणा-या १४ बारबाला तसेच बार मालकासह २४ जणांना डायघर पोलिसांनी रविवारी अटक केली.

ठळक मुद्देडायघर पोलिसांची कारवाईजामिनावर सुटकापाच ग्राहकांचीही केली धरपकड

ठाणे : रात्री उशिरापर्यंत चालणा-या पिंपरीनाका, दहिसर (डायघर) येथील एका बारवर डायघर पोलिसांनी रविवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास छापा टाकून १४ बारबालांसह २४ जणांना अटक केली. या सर्वांची ठाणे न्यायालयाने वैयक्तिक जामिनावर सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.डायघर परिसरातील दहिसर येथील रॉयल गोल्ड बारमध्ये नियमांपेक्षा जास्त बारबाला लेडिज सर्व्हिसच्या नावाखाली अश्लील चाळे करून रात्री उशिरापर्यंत नृत्य करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणे शहर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे आदींच्या पथकाने १८ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास या बारवर छापा टाकून बारमालक इंद्रमणी त्रिपाठी (४२, रा. परेल, मुंबई), व्यवस्थापक सुरेश मोगवीरा (३८, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई), डॅनिअल सरकार, प्रदीप मालिक, अमितकुमार कुमी, भागीरथ दास आणि पवन सिंह हे कर्मचारी तसेच चार गिºहाइके आणि १४ बारबाला आदी २४ जणांना अटक केली. सार्वजनिक ठिकाणी बीभत्स वर्तन केल्याप्रकरणी या बारबालांवर तसेच विहित वेळेपेक्षा जास्त वेळ बार सुरू ठेवून नियमांपेक्षा जास्त मुलींना रात्रीच्या वेळी कामावर ठेवल्याप्रकरणी बारमालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व बारबालांसह बारमालक आणि व्यवस्थापक आदी २४ जणांची प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे एक लाख ४४ हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर ठाणे न्यायालयाने सुटका केली.एखाद्या बारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीने रात्री ९.३० वाजेपर्यंत चार महिला वेटर्सना सेवा देण्याची परवानगी आहे. रात्री ९.३० वाजेनंतर केवळ चार महिला आॅर्केस्ट्रा कलाकार बारमध्ये गायनाची नोकरी करू शकतात. परंतु, या बारमध्ये १३ तरुणी अश्लील हावभाव करत ग्राहकांना आकृष्ट करत असल्याचे तसेच अश्लील नृत्य करीत ग्राहकांची लूट करत असल्याचे आढळले. पोलिसांनी छापा टाकून या सर्वांवर कारवाई केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीraidधाड