ठाण्यातील २४ लाख ७२ हजारांची वीज चोरी उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 11:45 PM2021-07-20T23:45:40+5:302021-07-20T23:48:01+5:30

वीजमीटरमध्ये फेरफार करून रिमोट किट लावून विजेची चोरी करणाऱ्या ठाण्यातील वर्तकनगर येथील एका उद्योजकावर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. यात एक लाख ३५ हजार ४६६ युनिटची २४ लाख ७२ हजार १६० रुपयांची वीज चोरी केल्याचे आढळले आहे.

24 lakh 72 thousand power theft in Thane exposed | ठाण्यातील २४ लाख ७२ हजारांची वीज चोरी उघड

वर्तकनगर येथील उद्योजकावर गुन्हा

Next
ठळक मुद्देवर्तकनगर येथील उद्योजकावर गुन्हातब्बल एक लाख ३५ हजार ४६६ युनिट वीजेवर डल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वीजमीटरमध्ये फेरफार करून रिमोट किट लावून विजेची चोरी करणाऱ्या ठाण्यातील वर्तकनगर येथील एका उद्योजकावर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. यात एक लाख ३५ हजार ४६६ युनिटची २४ लाख ७२ हजार १६० रुपयांची वीज चोरी केल्याचे आढळले आहे. महावितरणच्या भांडूप नागरी परिमंडळाने यासंबंधीची कारवाई केल्याची माहिती वीज वितरण कंपनीने मंगळवारी दिली.
ठाणे येथील शिवाईनगर शाखा लोकमान्य नगर उपविभागात इंडियन टेक्निकल वर्क्स ही कंपनी आहे. लोकमान्यनगरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नारायण सोनावणे, शिवाईनगरचे सहाय्यक अभियंता धनाजी पुकळे तसेच वरिष्ठ तंत्रज्ञ संदीप मंडावळे आदींच्या पथकाने १० जुलै २०२१ रोजी याच कंपनीमध्ये तपासणी केली. तेंव्हा येथील वीज मीटरमध्ये फेरफार असल्याचा संशय आला. त्यामुळे ग्राहक प्रतिनिधीच्या समवेत १२ जुलै रोजी पंचांसमोर सील उघडून या पथकाने तपासणी केली. तेंव्हा वीजमीटरमध्ये फेरफार करून रिमोट किट लावून वीजेची चोरी केल्याचे समोर आले. या ग्राहकाने तब्बल एक लाख ३५ हजार ४६६ युनिटची २४ लाख ७२ हजार १६० रु पयांची वीज अनधिकृतपणे वापरल्यामुळे वीज अधिनियम २००३ मधील कलम १३५ नुसार १९ जुलै रोजी इंडियन टेक्निकल वर्क्सचा मालक अजमल जमाल सय्यद याच्याविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी ही वीजचोरी पकडल्याबद्दल संबंधित अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. वीज वापरणाºया ग्राहकांचाही अशा वीज चोरीमुळे नुकसान होते. ग्राहकांनी अधिकृतपणे विजेचा वापर करावा, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्य अभियंता गणेशकर ग्राहकांना दिला आहे.

Web Title: 24 lakh 72 thousand power theft in Thane exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.