CoronaVirus : ठाणे जिल्ह्यात २२४ कोरोना रुग्णांची वाढ, सहा जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 20:19 IST2021-08-19T20:19:41+5:302021-08-19T20:19:59+5:30

ठाण्यात ४९ रुग्णांच्या वाढीसह एक मृत्यू आहे. तर कल्याण डोंबिवलीत ६३ रुग्ण वाढीसह दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

224 corona patients Increase and six deaths in Thane district | CoronaVirus : ठाणे जिल्ह्यात २२४ कोरोना रुग्णांची वाढ, सहा जणांचा मृत्यू

CoronaVirus : ठाणे जिल्ह्यात २२४ कोरोना रुग्णांची वाढ, सहा जणांचा मृत्यू


ठाणे: जिल्ह्यात गेल्या २४ तासात २२४ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांच्या तुलनेत आज मात्र रुग्ण संख्या काही अंशी वाढली आहे. ठाण्यात ४९ रुग्णांच्या वाढीसह एक मृत्यू आहे. तर कल्याण डोंबिवलीत ६३ रुग्ण वाढीसह दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

याशिवाय, उल्हासनगरमध्ये साह रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू आहे. भिवंडी परिसरात आज एकही रुग्ण आढळला नाही तसेच एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मीरा भाईंदरला १८ रुग्णांची वाढ झाली आहे. अंबरनाथ येथे आठ रुग्ण वाढले असून मृत्यू नाही. बदलापूरमध्ये नऊ रुग्णांची आज वाढ झाली असून मृत्यू नाही. तर जिल्ह्यातील गांवपाड्यात नऊ रुग्ण सापडले असून मृत्यूची नोंद नाही.
 

Web Title: 224 corona patients Increase and six deaths in Thane district