शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

पोटच्या मुलीवर बलात्कार, ६२ वर्षीय बापास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:09 AM

पोटच्या अठरावर्षीय मुलीला जेवणातून झोपेचे औषध देऊन दोन महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या ६२ वर्षांच्या बापास मीरा रोडच्या नयानगर पोलिसांनी अटक केली आहे.

मीरा रोड : पोटच्या अठरावर्षीय मुलीला जेवणातून झोपेचे औषध देऊन दोन महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या ६२ वर्षांच्या बापास मीरा रोडच्या नयानगर पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या फेसबुक मित्राच्या मदतीने या घृणास्पद प्रकारास वाचा फुटली असून, या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.नयानगर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा आरोपी बाप हा त्याची एक मुलगी, मुलगा तसेच दुसरी पत्नी आणि तिच्या मुलासोबत राहतो. व्यावसायिक असलेला बाप पत्नी घरी नसली की, महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीला रात्री जेवणातून झोपेचे औषध देत असे. ती गाढ झोपली की, तिच्यावर बलात्कार करत असे. त्यामुळे सकाळी मुलीला त्रास जाणवत होता. तिला संशय आल्याने आठवडाभरापूर्वी बापाने आणलेले जेवण टाकून देत ते जेवल्याचे नाटक तिने केले. मुलगी झोपल्याचे पाहून बाप जवळ आला आणि अश्लील चाळे करू लागला. त्यावेळी तिने उठून या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला; पण बापाने मारहाण करत तिला जीवे मारायची धमकी दिली. हा घृणास्पद प्रकार तिने फेसबुकवरील एका मित्रास सांगितला. त्याने एका संस्थेच्या मदतीने माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी बापास ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली.पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या नराधम बापास ठाणे न्यायालयाने १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक एस.डी. निकम करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी