पोटच्या मुलीवर बलात्कार, ६२ वर्षीय बापास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:09 IST2019-03-29T00:09:38+5:302019-03-29T00:09:46+5:30

पोटच्या अठरावर्षीय मुलीला जेवणातून झोपेचे औषध देऊन दोन महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या ६२ वर्षांच्या बापास मीरा रोडच्या नयानगर पोलिसांनी अटक केली आहे.

 22-year-old raped child | पोटच्या मुलीवर बलात्कार, ६२ वर्षीय बापास अटक

पोटच्या मुलीवर बलात्कार, ६२ वर्षीय बापास अटक

मीरा रोड : पोटच्या अठरावर्षीय मुलीला जेवणातून झोपेचे औषध देऊन दोन महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या ६२ वर्षांच्या बापास मीरा रोडच्या नयानगर पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या फेसबुक मित्राच्या मदतीने या घृणास्पद प्रकारास वाचा फुटली असून, या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.
नयानगर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा आरोपी बाप हा त्याची एक मुलगी, मुलगा तसेच दुसरी पत्नी आणि तिच्या मुलासोबत राहतो. व्यावसायिक असलेला बाप पत्नी घरी नसली की, महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीला रात्री जेवणातून झोपेचे औषध देत असे. ती गाढ झोपली की, तिच्यावर बलात्कार करत असे. त्यामुळे सकाळी मुलीला त्रास जाणवत होता. तिला संशय आल्याने आठवडाभरापूर्वी बापाने आणलेले जेवण टाकून देत ते जेवल्याचे नाटक तिने केले. मुलगी झोपल्याचे पाहून बाप जवळ आला आणि अश्लील चाळे करू लागला. त्यावेळी तिने उठून या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला; पण बापाने मारहाण करत तिला जीवे मारायची धमकी दिली. हा घृणास्पद प्रकार तिने फेसबुकवरील एका मित्रास सांगितला. त्याने एका संस्थेच्या मदतीने माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी बापास ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली.
पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या नराधम बापास ठाणे न्यायालयाने १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक एस.डी. निकम करत आहेत.

Web Title:  22-year-old raped child