शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कल्याण-डोंबिवली महापालिकेला २१८ कोटींच्या वसुलीचे वेध, मोकळ्या जमिनीचा कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 04:38 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र तसेच त्यामध्ये समाविष्ट केलेल्या २७ गावांतील मोकळ्या जागेवरील करापोटी चालू आणि थकबाकीची रक्कम २१८ कोटी रुपये आहे. सध्या ३०० कोटी रुपयांच्या तुटीमुळे भीषण आर्थिक संकटाचा सामना करणारे केडीएमसीचे प्रशासन हीच थकबाकी प्राधान्याने वसूल करण्याचा प्रयत्न करत आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र तसेच त्यामध्ये समाविष्ट केलेल्या २७ गावांतील मोकळ्या जागेवरील करापोटी चालू आणि थकबाकीची रक्कम २१८ कोटी रुपये आहे. सध्या ३०० कोटी रुपयांच्या तुटीमुळे भीषण आर्थिक संकटाचा सामना करणारे केडीएमसीचे प्रशासन हीच थकबाकी प्राधान्याने वसूल करण्याचा प्रयत्न करत आहे.कल्याण-डोंबिवलीमधील बिल्डरांकडून मोकळ्या जमिनीच्या करापोटी १६० कोटी रुपये येणे बाकी आहे, तर २७ गावांतील केवळ आठ बिल्डरांकडून ५८ कोटी १७ लाख ३२ हजार ९२२ रुपये येणे आहे. पालिका आयुक्तांनी १० कनिष्ठ अभियंत्यांची कुमक वसुलीकरिता कामाला लावली आहे.या गावातील मोकळ्या जागेवरील करापोटी महापालिकेस येणे असलेल्या ५८ कोटी १७ लाख रुपयांपैकी चालू मागणी २२ कोटी २२ लाख ८२ हजार रुपये इतकी आहे, तर थकबाकी ३५ कोटी ९४ लाख ५० रुपये आहे. ही थकबाकी केवळ आठ बड्या बिल्डरांकडून येणे बाकी आहे. त्यांनी लाखो चौरस मीटर क्षेत्रावर त्यांचे गृहसंकुल प्रकल्प थाटले आहेत.प्रभाग क्रमांक १२१ च्या नगरसेविका पूजा पाटील यांनी महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाकडे याबाबत विचारणा केली होती. त्याला दिलेल्या उत्तरात चालू करापैकी एक रुपयाही महापालिकेने वसूल केलेला नाही. यापूर्वीच्या ३५ कोटी ९४ लाख रुपये थकबाकीपैकी केवळ १४ लाख ७४ हजार रुपयांची वसुली केली असल्याची माहिती पाटील यांना देण्यात आली. ज्या बिल्डरांकडून थकबाकीची मागणी करण्यात आलेली आहे. त्या बिल्डरांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधकाम परवानगी घेतलेली आहे. ज्या इमारतधारकांनी निवास परवानगी घेतली आहे त्यांना बिले दिली आहेत. त्यांच्याकडील करआकारणीचे काम अद्याप सुरू आहे. भविष्यात करआकारणीचे क्षेत्र व करआकारणीत बदल अपेक्षित आहे.कल्याण-डोंबिवलीत१६० कोटींची थकबाकीकल्याण व डोंबिवलीतील बिल्डरांकडून मोकळ्या जागेच्या थकबाकीपोटी १६० कोटी रुपये येणे बाकी आहे. मोकळ्या जागेवरील करआकारणी ही राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत केडीएमसीत सगळ्यात जास्त आहे. हा कर कमी करावा, अशी मागणी एमसीएचआय या बिल्डरांच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांकडेही केली आहे.मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपलीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोकळ्या जागेवरील कर कमी करण्याचे आदेश महापालिकेस दिले होते. एप्रिल महिन्यात पालकमंत्र्यांनी एमसीएचआयच्या प्रदर्शन कार्यक्रमात तसे आदेश दिले होते. पालकमंत्र्यांच्या आदेशाची महापालिकेने अंमलबजावणी केलेली नाही. अनेक बिल्डरांनी थकबाकीविरोधात दावे दाखल केलेले असल्याने थकबाकी व वसुली वादात आहे.आर्थिककोंडी फोडण्यासाठीथकबाकी वसुलीवर भरमहासभेत पालिकेच्या आर्थिक कोंडीचा विषय उपस्थित झाला, तेव्हा मोकळ्या जागेवरील बिल्डरांच्या थकबाकी वसुलीची सूचना काही सदस्यांनी केली. त्याला एमसीएचआयचे अध्यक्ष व भाजपा नगरसेवक मनोज राय यांनी विरोध केला होता. कर कमी केल्यास बिल्डर थकबाकी भरतील, असेही नमूद केले होते.८० हजार बेकायदा बांधकामे नियमित करण्याचाही पर्याय२७ गावांत ८० हजार बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. मुख्यमंत्र्यांनी बेकायदा बांधकामे नियमित करण्याची डेडलाइन २०१५ पर्यंत असल्याचे नमूद केले आहे. महापालिकेत २७ गावे ही जून २०१५ नंतर समाविष्ट झाली. २०१५ नंतर एकाही बांधकामाला महापालिकेने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ८० हजार बेकायदा बांधकामे नियमित केल्यास महापालिकेच्या मालमत्ताकरात कोट्यवधी रुपयांची भर पडू शकते.राज्य शासनाने २७ गावांमधील थकबाकीची ३२ हजार कोटी रुपयांहून अधिक थकबाकी वसूल केल्यास महापालिकेस सरकार हजारो कोटींचा निधी देऊ शकते.- संतोष डावखर, विकासक

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका