Corona Virus : ठाणे जिल्ह्यात २१३ नवे कोरोना बाधित, पाच जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 21:33 IST2021-08-15T21:32:58+5:302021-08-15T21:33:16+5:30
ठाणे शहरात ५० रुग्णांच्या वाढीसह आज एकाचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीत आज ४४ रुग्णांची वाढ झाली.

Corona Virus : ठाणे जिल्ह्यात २१३ नवे कोरोना बाधित, पाच जणांचा मृत्यू
ठाणे- जिल्ह्यातील महापालिका आणि गावपातळीवर २१३ कोरोना रुग्णांची वाढ झाली. गेल्या २४ तासांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे भिवंडीत एकाही मृत्यूची नोंद नाही.
ठाणे शहरात ५० रुग्णांच्या वाढीसह आज एकाचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीत आज ४४ रुग्णांची वाढ झाली. उल्हासनगरमध्ये सात रुग्ण वाढले. तर दोघांचा मृत्यू झाला. भिवंडी परिसरात आज एकही रुग्ण नसून मृत्यूही नाही. मीरा-भाईंदरला २२ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. अंबरनाला १३ रुग्ण वाढले असून एक मृत्यू. बदलापूरमध्ये १७ रुग्णांची आज वाढ असून एकही मृत्यू नाही. तर जिल्ह्यातील गांवपाड्यात १६ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे.