शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

बैलांच्या झुंजीचे आयोजन करणा-यांसह २० जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 10:15 PM

भिवंडी : बैलाच्या झुंजीचे आयोजन करण्यास बंदी असताना तालुक्यातील सोनाळे गावाच्या नदीकिनारी बैलांच्या झुंजीचे आयोजन केल्याने तालुका पोलीस ठाण्यात आयोजकांसह १५ ते २० जणांविरोधात प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी : बैलाच्या झुंजीचे आयोजन करण्यास बंदी असताना तालुक्यातील सोनाळे गावाच्या नदीकिनारी बैलांच्या झुंजीचे आयोजन केल्याने तालुका पोलीस ठाण्यात आयोजकांसह १५ ते २० जणांविरोधात प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यात प्रथमच बैलांच्या झुंजी लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने गावक-यांमध्ये संतप्त वातावरण आहे. बैलांच्या झुंजींना बंदी असताना तालुक्यातील सोनाळे गावाजवळील नदी किना-यावरील मोकळ्या जागेत बैलांच्या झुंजीचे आयोजन करण्यात आले होते. याची माहिती तालुका पोलीस ठाण्यातील पोलिसांना मिळताच त्यांनी साध्या वेषांत घटनास्थळी जाऊन मोबाईलमध्ये या झुंजीचे चित्रीकरण केले. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांचा ताफा आल्याचे पाहून आयोजकांसह झुंजी लावणा-यांनी पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळावरून झुंजीसाठी आणलेल्या दोन बैलांसह जीप व टेम्पोे असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी आयोजक दीपक किसन पाटील आणि छोट्या सुक-या पाटील यांच्यासह १५ ते २० जणांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच जप्त केलेले दोन बैल पोलिसांनी आनगाव येथील गोशाळेत जमा केले. पोलीस आयोजक व वाहनमालकाच्या मागावर असून, लवकरच त्यांच्यावर कारवाई करणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :bhiwandiभिवंडीCrimeगुन्हा